Russia-Ukraine Crisis: 'संकट काळात NATO आणि अमेरिकेने साथ सोडली, आम्ही स्वबळावर लढणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:32 PM2022-02-25T14:32:57+5:302022-02-25T14:33:05+5:30

Russia-Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. यातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशाच्या नावे एक संदेश जारी केला आहे.

Ukraine | Russia | America | Russia-Ukraine war| Russia-Ukraine Crisis | 'NATO and US leave us, we will fight on our own', says Volodymyr Zelenskyy | Russia-Ukraine Crisis: 'संकट काळात NATO आणि अमेरिकेने साथ सोडली, आम्ही स्वबळावर लढणार'

Russia-Ukraine Crisis: 'संकट काळात NATO आणि अमेरिकेने साथ सोडली, आम्ही स्वबळावर लढणार'

Next

कीव:रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा(Russia Ukraine Crisis) आज दुसरा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैन्य राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करुन देशवासियांना धैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. 

'सर्वांनी आमची साथ सोडली'
झेलेन्स्की आपल्या व्हिडिओ संदेशात म्हणाले की, 'या युद्धात अमेरिका आणि NATO देश आम्हाला मदत करतील अशी अशा होती, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ऐनवेळी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास नकार दिला. यामुळे मला खूप वेदना झाल्या आहेत. ऐन युद्धात लढण्यासाठी जगाने आम्हाला एकटे सोडले. पण, मी देशाची साथ सोडणार नाही. मी आताही सरकारी क्वार्टरमध्ये इतर अधिकाऱ्यांसोबत राहत आहे. रशिया चुकीच्या मार्गावर गेले आहे, पण आम्ही नाही.'

'आम्ही स्वबळावर लढणार'
'आम्ही आमच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी एकटे पडलो आहोत. पण, आम्ही आता रशियाशी स्वबळावर युद्ध लढणार. आमच्यासोबत लढायला कोणीच तयार नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यास सगळे घाबरले आहेत. आपल्या सैन्याने सीमेचे रक्षण करताना आपले शौर्य दाखवले. आपले अनेक सैनिक शहीद झाले, पण रशियन सैन्याला शरणागती पत्करली नाही. आज आपण 137 नागरिकांसह 10 लष्करी अधिकारी गमावले आहेत. या सर्वांना मरणोत्तर हिरो ऑफ युक्रेन ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. युक्रेनसाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांना नेहमी लक्षात ठेवा.'

'मी शत्रुचे प्रमुख लक्ष्य'
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, 'रशियन सैन्याने कीवमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात विध्वंस, तोडफोड केली. असे असूनही, आम्ही आमच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मी राजधानीत राहतो, माझे कुटुंब देखील युक्रेनमध्ये आहे. माझे कुटुंब नेमके कुठे आहेत, हे सांगण्याचा मला अधिकार नाही. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, शत्रूने मला लक्ष्य क्रमांक 1 आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य क्रमांक 2 म्हणून चिन्हांकित केले आहे.

दुसऱ्या दिवशीही युक्रेन स्फोटांनी हदरले
आज सलग दुस-या दिवशीही रशियाने युक्रेनवर अनेक बॉम्ब टाकले आहेत.  शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जाहीर केले की, देशातील संपूर्ण सैन्य युद्धात उतरणार आहे. युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत. युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे.

Web Title: Ukraine | Russia | America | Russia-Ukraine war| Russia-Ukraine Crisis | 'NATO and US leave us, we will fight on our own', says Volodymyr Zelenskyy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.