रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia Crises) तणाव वाढत आहे. हल्ला होणार नाही, असे दावे निश्चितपणे केले जात आहेत. मात्र जमिनीवर परिस्थिती याच्या उलट असल्याचं दिसून येत आहे. आता शुक्रवारी पूर्व युक्रेनमध्ये एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतलेल्या डोनेस्क या पूर्वेकडील युक्रेनियन शहरात ही घटना घडली. हे वाहन प्रादेशिक सुरक्षा प्रमुख डेनिस सिनेन्कोव्ह यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, पूर्व युक्रेनमधील गॅस पाइपलाइनच्या एका भागाला आग लागल्याची माहिती समोर आली.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यापासून, फॉल्स फ्लॅग मोहिमेअंतर्गत रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो असा इशारा पश्चिमेकडील अनेक देश सतत देत आहेत. सध्या या कार स्फोटाच्या घटनेसाठी रशिया युक्रेनच जबाबदार असल्याचं म्हणत आहे. त्याच वेळी, फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या दोन्ही भागातून मुले आणि महिलांचे पलायनही सुरू झाले आहे. युक्रेन लवकरच मोठा हल्ला करू शकतो, असे सांगून सर्वांना पाठवलं जात आहे. मात्र युक्रेनने हे दावे ठामपणे फेटाळले आहेत. तर दुसरीकडे युक्रेनने रशियावर आरोप केले आहेत.
अमेरिकेचा इशारासध्या परिस्थिती तणावपूर्ण असून रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. पुतिन युक्रेनवर हल्ला करू शकतात असे इनपुट्स अमेरिकेला मिळाले आहेत. ते युक्रेनच्या राजधानीवरही हल्ला करू शकतात. आपण युक्रेनच्या सीमेवर अमेरिकन सैन्य पाठवणार नाही. मात्र अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असेल, असं बायडेन यांनी स्पष्ट केले.