Russia-Ukraine Crisis: विनोदी अभिनेते ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, असे पालटले वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:34 PM2022-02-24T18:34:06+5:302022-02-24T18:34:55+5:30

Russia-Ukraine Crisis:एका टीव्ही शोने पालटले वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे आयुष्य, 2019 मध्ये बनले युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष.

Ukraine | Russia | Life of Volodymyr Zelensky changed from comedian to President of Ukraine | Russia-Ukraine Crisis: विनोदी अभिनेते ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, असे पालटले वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे आयुष्य

Russia-Ukraine Crisis: विनोदी अभिनेते ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, असे पालटले वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे आयुष्य

Next

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढला आहे, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे NATO देश आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) हे चर्चेत आहेत. संपूर्ण जगाच्या नजरा आता झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर आहेत. 

युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष
युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी 2019 मध्ये युक्रेनची सत्ता हाती घेतली होती. 44 वर्षीय वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते आता सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे.

सामान्य कुटुंबात जन्म
वोलोडिमिर झेलेन्स्कीचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी झाला. त्यांचे वडील प्राध्यापक होते आणि आई अभियंता होती. त्यांचे आजोबा सायमन इव्हानोविच झेलेन्स्की दुसऱ्या महायुद्धात रेड आर्मीचा भाग होते. सायमनचे वडील आणि तीन भाऊ होलोकॉस्टमध्ये मारले गेले. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या झेलेन्स्कीकडे कायद्याची पदवी आहे. मात्र त्यांनी कधीच वकिली केली नाही. 

एका टीव्ही शोमधून मिळाली लोकप्रियता
व्होलोडिमिर झेलेन्स्कींनी वयाच्या 17 व्या वर्षापासून मनोरंजन क्षेत्रात काम करणे सुरू केले. त्यांच्या 'सर्व्हेंट ऑफ द पीपल' या टीव्ही शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. 2015 मध्ये आलेल्या या टीव्ही शोमध्ये त्यांनी शाळेतील शिक्षकाची भूमिका साकारली होती. एके दिवशी या शिक्षकाचा विद्यार्थी त्याचा एक व्हिडिओ बनवतो ज्यामध्ये हा शिक्षक भ्रष्टाचाराविरोधात जोरदार भाषण करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर व्हायरल होतो आणि तो व्यक्ती राष्ट्रपती बनतो, अशी त्या शोची गोष्ट होती. 

राजकारणात प्रवेश
ही मालिका खूप लोकप्रिय झाली झेलेन्स्कींनाही प्रसिद्धी मिळाली. झेलेन्स्की यांनी स्वतः त्या शोची निर्मीती केली होती. हा शो युक्रेनमध्ये प्रचं हिट झाला. पण, यानंतर झेलेन्स्की यांनी मनोरंज क्षेत्र सोडून राजकारणात पडण्याचा निर्णय घेतला. राजकारणात आल्यानंतर हळुहळू ते मोठे होत गेले आणि 2019 मध्ये युक्रेनचे सहावे राष्ट्राध्यक्ष बनले. सध्या संपूर्ण जगाच्या नजरा झेलेन्स्की यांच्याकडे लागल्या आहेत. या परिस्थितीची ते कशाप्रकारे सामना करतात, ते पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: Ukraine | Russia | Life of Volodymyr Zelensky changed from comedian to President of Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.