Ukraine-Russia War: रशिया-युक्रेन युद्धात 20 हजार भारतीय अडकले; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:47 PM2022-02-25T16:47:45+5:302022-02-25T16:50:57+5:30

Ukraine-Russia War:रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीय विद्यार्थी आणि इतर नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांची गैरसोय पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Ukraine | Russia | Russia-Ukraine war | 20000 Indians trapped in Russia-Ukraine war; Government of India took a big decision | Ukraine-Russia War: रशिया-युक्रेन युद्धात 20 हजार भारतीय अडकले; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

Ukraine-Russia War: रशिया-युक्रेन युद्धात 20 हजार भारतीय अडकले; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथे अडकलेल्या परदेशी नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. भारतातील हजारो विद्यार्थी आणि इतर लोक तिथे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आता भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकार विशेष उड्डाणे चालवणार असून, त्याचा सर्व खर्च भारत सरकार स्वतः उचलणार आहे.

युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले 
मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सुमारे 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकी 18 हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. रशिया-युक्रेनमध्ये लष्करी तणाव सुरू झाल्यानंतर तेथील विद्यार्थी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. सोशल मीडियावर वारंवार व्हिडिओ शेअर करुन ते भारत सरकारकडे परत आणण्याची विनंती करत आहेत.

युक्रेनची परिस्थिती बिघडली
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडली आहे. खाद्यपदार्थांचा तुटवडा सुरू असून, एटीएम मशीनमध्येही पैसे मिळत नाहीये. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीचे वातावरण तयार होत आहे. युक्रेनची राजधानी कीववर रशियन क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट वाढली आहे. त्यांच्या पालकांनीही सरकारला त्यांच्या मुलांना युक्रेनमधून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.

भारत आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढणार आहे
विद्यार्थ्यांसोबतच राजकारण्यांनीही भारत सरकारला या प्रकरणी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मोदी सरकारला युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली.

सरकारने योजना आखली आहे
या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आधी रस्त्याने शेजारील पोलंड आणि हंगेरी येथे आणले जाईल आणि नंतर विमानाने त्यांच्या मायदेशी परतले जाईल. यासाठी सरकारने युक्रेन, हंगेरी, पोलंडसह सर्व संबंधित सरकारांकडून सहकार्य मागितले आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: Ukraine | Russia | Russia-Ukraine war | 20000 Indians trapped in Russia-Ukraine war; Government of India took a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.