शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Ukraine-Russia War: रशिया-युक्रेन युद्धात 20 हजार भारतीय अडकले; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 4:47 PM

Ukraine-Russia War:रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीय विद्यार्थी आणि इतर नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांची गैरसोय पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथे अडकलेल्या परदेशी नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. भारतातील हजारो विद्यार्थी आणि इतर लोक तिथे अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आता भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकार विशेष उड्डाणे चालवणार असून, त्याचा सर्व खर्च भारत सरकार स्वतः उचलणार आहे.

युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सुमारे 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यापैकी 18 हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. रशिया-युक्रेनमध्ये लष्करी तणाव सुरू झाल्यानंतर तेथील विद्यार्थी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. सोशल मीडियावर वारंवार व्हिडिओ शेअर करुन ते भारत सरकारकडे परत आणण्याची विनंती करत आहेत.

युक्रेनची परिस्थिती बिघडलीविद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती झपाट्याने बिघडली आहे. खाद्यपदार्थांचा तुटवडा सुरू असून, एटीएम मशीनमध्येही पैसे मिळत नाहीये. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीचे वातावरण तयार होत आहे. युक्रेनची राजधानी कीववर रशियन क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट वाढली आहे. त्यांच्या पालकांनीही सरकारला त्यांच्या मुलांना युक्रेनमधून बाहेर काढण्याची विनंती केली आहे.

भारत आपल्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढणार आहेविद्यार्थ्यांसोबतच राजकारण्यांनीही भारत सरकारला या प्रकरणी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मोदी सरकारला युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची घोषणा करण्यात आली.

सरकारने योजना आखली आहेया विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आधी रस्त्याने शेजारील पोलंड आणि हंगेरी येथे आणले जाईल आणि नंतर विमानाने त्यांच्या मायदेशी परतले जाईल. यासाठी सरकारने युक्रेन, हंगेरी, पोलंडसह सर्व संबंधित सरकारांकडून सहकार्य मागितले आहे. लवकरच ही मोहीम सुरू होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीयCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी