कीव:रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनवर ताबा मिळवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी सैन्याच्या बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी NATO देशांनी युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ऐनवेळी या देशांनी आपला शब्द पाळला नाही. यामुळे बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेन युद्धात एकटा पडला. रशियाने युक्रनेच्या प्रमुख सैन्य स्थळांवर हल्ले केले, अनेक शहरांचा ताबा मिळवला. अणु उर्जा प्रकल्पही ताब्यात घेतला. या सर्व घडामोडीनंतर आता युक्रेनकडे तीन पर्याय उरले आहेत.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे 3 पर्याय सध्याची परिस्थिती पाहता युक्रेन स्वबळावर रशियाशी जास्त काळ लढू शकत नाही. आम्ही रशियाला 96 तासांपेक्षा जास्त थांबवू शकणार नाही, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात कधीही घुसू शकते. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडे तीन पर्याय आहेत. एकतर त्यांनी हार पत्करुन आत्मसमर्पण करावे, दुसरा म्हणजे देश सोडून पळ काढावा आणि तिसरा म्हणजे रशियन सैन्याच्या हाती अटक व्हावे.
आत्मसमर्पणाने प्रश्न सुटतीलअशा स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे युद्ध फार काळ चालणार नाही आणि युक्रेन लवकरच कोसळेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे युक्रेनने शरणागती पत्करावी असे अनेक संरक्षण तज्ञ म्हणत आहेत. युक्रेनने शरणागती पत्करली तर तेथील लाखो लोकांचे प्राण वाचतील.
येत्या 24 तासांत परिस्थिती स्पष्ट होईलयेत्या 24 तासांत युक्रेनने आत्मसमर्पण केले नाही तर रशियन सैन्य राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अटक करू शकते, असे मानले जात आहे. युक्रेनचे गृहमंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी देखील एक निवेदन जारी केले की शुक्रवार, 25 फेब्रुवारी रोजी रशिया युक्रेनची राजधानी कीवला वेढा घालण्याची योजना आखत आहे.