युक्रेनवर रशियाचे लष्करी हल्ले (Ukraine Russia Crisis) सातत्याने सुरू असून, यामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस होत आहे. दरम्यान, युद्ध परिस्थिती पाहता नाटो (NATO ) रशियाविरोधात जोरदार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाटोचे 30 सदस्य देश रशियावर हल्ला करण्याची योजना आखत आहेत.
नाटो रशियाविरोधात कलम-4चा वापर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हल्ला करुन तेथील लष्करी तळांवर मोठा विध्वंस केला आहे. अशा स्थितीत नाटो रशियावर प्रत्युत्तराची कारवाई करण्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बोरिस जॉन्सन यांनी केला हल्ल्याचा निषेध इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला असून इंग्लंड आणि आमचे मित्र देश जोरदार प्रत्युत्तर देतील, असे म्हटले आहे. याशिवाय जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ब्रॅंडनबर्ग गेटवरही युक्रेनच्या ध्वजासह एकता दाखवण्यात आली. हल्ल्यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केली. यासह त्यांनी फ्रान्स आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली.
तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याच्या रशियाच्या निर्णयाची निंदा केली. तसेच, अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र रशियाची जबाबदारी निश्चित करतील, असेही म्हटले. सात नेत्यांच्या गटाच्या बैठकीनंतर गुरुवारी अमेरिकन लोकांशी बोलण्याची योजना असल्याचे बायडेन यांनी सांगितले. बिडेन यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, "रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्वनियोजित युद्धाची निवड केली आहे ज्याचा लोकांच्या जीवनावर विनाशकारी परिणाम होईल. या हल्ल्यातील जीवितहानी आणि विध्वंसासाठी केवळ रशिया जबाबदार असेल, अमेरिका आणि त्याचे मित्र आणि भागीदार एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने प्रत्युत्तर देतील."