Russia-Ukraine War: युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 02:30 PM2022-02-27T14:30:35+5:302022-02-27T14:37:22+5:30

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे, यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

Ukraine | Russia | Volodymyr Zelensky | Russia-Ukraine war| 'dance' video of the President of Ukraine Volodymyr Zelensky | Russia-Ukraine War: युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Russia-Ukraine War: युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा 'डान्स' व्हिडिओ व्हायरल, तुम्ही पाहिला का?

Next

कीव: रशियाने(Russia) युक्रेनवर(Ukraine)  हल्ला करुन बराच भाग आपल्या ताब्यात मिळवला आहे. या दोन देशांच्या युद्धाची(War) जगभर चर्चा सुरू आहे. या युद्धापूर्वी आपल्यापैकी अनेकांना युक्रेनदेशाबद्दल आणि त्याच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल काही माहिती नव्हती. पण, या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की(Volodymyr Zelensky)  यांची सर्वत्र चर्चा होत आहे. अशा कठीण काळात झेलेन्स्की धैर्याने आणि शौर्याने आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. 

झेलेन्स्कींचा व्हिडिओ व्हायरल
या युद्ध परिस्थितीत व्होओडिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते मंचावर डान्स(Volodymyr Zelensky Dance) करताना दिसत आहेत. आपल्यापैकी क्वचित कोणाला माहित असेल की, राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी एक अभिनेते होते आणि त्यांनी 2006 एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी झेलेन्स्कींच्या नृत्य कौशल्याची अनेकांनी प्रशंसा केली होती.

झेलेन्स्की ठरले विजेते
'डान्सिंग विथ द स्टार्स' या रिअॅलिटी शोच्या मंचावर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये झेलेन्स्की त्यांच्या जोडीदार ओलेना शॉपटेन्कोसह डान्स स्टेप्सने सर्वांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहे. व्होलोडिमीर झेलेन्स्कींचा हा व्हिडिओ इंटरनेटवर अनेकांना आवडत आहे. विशेष म्हणजे, त्या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये झेलेन्स्की विजेते ठरले होते. ट्विटरवर व्हायरल होत असलेला झेलेन्स्कींचा व्हिडिओ 2006 चा आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, नेटीझन त्याव्हिडिओवर विविध कमेंट्सही करत आहेत. 
 

Web Title: Ukraine | Russia | Volodymyr Zelensky | Russia-Ukraine war| 'dance' video of the President of Ukraine Volodymyr Zelensky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.