अन्तालिया/कीव्ह : युक्रेन-रशिया दरम्यान युद्ध थांबविण्यासाठी मॉस्को आणि कीव्ह वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांदरम्यानची बोलणी निष्फळ ठरली, असे युक्रेनच्या विदेश मंत्र्यानी सांगितले. तुर्कीमध्ये दोन्ही देशांदरम्यान गुरुवारी झालेल्या बैठकीला युक्रेनचे विदेशमंत्री दिमित्रो कुलेबा आणि रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव उपस्थित होते.
रशिया-युक्रेनदरम्यान दोन आठवड्यांपासून भडकलेल्या युद्धात युक्रेनचे हजारो सैनिक आणि नागरिक ठार झाले आहे. २० लाखांहून अधिक लोकांना देशातून पलायन करावे लागले. रशियन फौजांनी घातलेल्या वेढ्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला आहे. अन्न-पाणी, औषधींसह इतर आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
युक्रेनच्या विदेश मंत्री कुलेबा सांगितले की, युद्धग्रस्त युक्रेनमधील लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि त्यासाठी युद्धविराम करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. युद्धविरामासाठी (शस्रबंदी) मॉस्को तयार नाही. युक्रेनने शरणागती पत्करावी, असे रशियाचे म्हणणे आहे. असे होणे नाही. शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग शोधण्याची लोकांची आशाही रशियाने संपुष्टात आणली आहे.
रशियाने इन्कार केला नाही, जबाबदारीही झटकली नाहीरशिया आणखी वाटाघाटीसाठी तयार आहे, रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे. परंतु, या वादात मॉस्को मवाळ भूमिका घेत असल्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत असे त्यांच्या बोलण्यातील रोखातून दिसते.बुधवारी मारियुपोलमधील एका प्रसूतीगृहावरील करण्यात हल्ल्यासंबंधी रशियन सरकारने पहिली प्रतिक्रिया दिली. विदेशमंत्री लावरोव यांनी हल्ल्याचा इन्कार केला नाही, किंवा जबाबदारीही झटकली नाही.अगोदर या परिसरात युक्रेनच्या जहालवादी लढवय्यांचा वेढा होता. तळ म्हणून ते या परिसराचा वापर करीत होते, असा दावा लावारोव यांनी केला. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली असली, तरी मृतांमध्ये एका बालकाचा समावेश असल्याचे मारियूपोल नगरपरिषदेने म्हटले आहे. हल्ल्यापूर्वी सर्व रुग्ण आणि परिचारिकांंना इतरत्र हलविण्यात आले होते, असा दावाही त्यांनीकेला.
रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्ह्यांची चौकशी व्हावीयुक्रेनवरील आक्रमण आणि एका प्रसूतीगृहासह नागिरकांवरील बॉम्ब हल्ल्याप्रकरणी रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केली आहे. त्या वॉरसा येेथे आल्या आहेत. त्यांच्या शेजारीच उभे असलेले पोलँडचे अध्यक्ष आंद्रेज डूडा यांनी म्हटले की, युक्रेनमध्ये रशिया युद्ध गुन्हा करीत आहे, हे स्पष्ट आहे.
युक्रेनच्या दोन शहरांतून७०० लोकांना बाहेर काढलेn रशियाच्या कब्जातील व्होरजेल आणि इरपिन या दोन शहरांतून ७०० नागरिकांना बुधवारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ही दोन्ही कीव्हलगत आहेत.n कारचा एक ताफा दोन्ही शहरातून बाहेर पडलेल्या नागरिकांना घेऊन सुरक्षित ठिकाणी निघाला. तीन अन्य शहरांत अडकडलेल्या लोकांना बाहेर काढण्याची मोहीम राबविता आली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.