Ukraine Helicopter Crash: घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:32 IST2023-01-18T14:32:07+5:302023-01-18T14:32:31+5:30
युक्रेनचे गृह मंत्री आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर राजधानी कीव्हजवळ कोसळले आहे.

Ukraine Helicopter Crash: घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू
रशिया युक्रेनमध्ये गेल्या वर्षीपासून युद्ध सुरु आहे. रशियाच्या सैन्याला मोठ्याप्रमाणावर युक्रेनच्या चिवट सैन्यामुळे नुकसान झाले असून राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतीन पुन्हा नव्याने हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. यातच युक्रेनमधून धक्कादायक बातमी येत आहे.
युक्रेनचे गृह मंत्री आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर राजधानी कीव्हजवळ कोसळले आहे. यामध्ये गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलांचाही समावेश असल्याचे युक्रेनी पोलिसांनी सांगितले आहे.
हेलिकॉप्टर युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेरील भागातील बोव्हरी येथील बालवाडीजवळ कोसळले आहे. घटनेनंतर ऑनलाइन प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये आवाज आणि आग दिसत आहे. अपघातावेळी नर्सरीमध्ये लहान मुले आणि कर्मचारी होते. यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे.
ब्रोव्हरी शहर कीवच्या ईशान्येस सुमारे 20 किलोमीटर (12 मैल) अंतरावर आहे. एप्रिलच्या सुरुवातीला रशियाच्या सैन्याने माघार घेईपर्यंत मॉस्कोच्या आक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रशियन आणि युक्रेनियन सैन्याने ब्रोव्हरीच्या नियंत्रणासाठी लढा दिला होता.