Russia Ukraine War China: शी जिनपींग पुतीन यांच्या मदतीला; मोठी खेळी! रशिया-चीनमध्ये ८ फेब्रुवारीलाच एक करार झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 03:27 PM2022-02-25T15:27:30+5:302022-02-25T15:27:55+5:30
China On Russia Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश युक्रेनसोबत आहेत, तर पाकिस्तान आणि चीन हे रशियाच्या बाजुने आहेत. भारतानेही थेट रशियाला पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाला विरोधात जाईल अशी भूमिका घेतलेली नाही.
बिजिंग : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. कीवची राजधानी किधीही पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनवर हल्ला केल्याने अमेरिकेसह अन्य देशांनी रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. याचा अंदाज रशियाला आधीच आला होता. यामुळे पुतीन यांनी २० दिवस आधीच त्याची तयारी केली होती. जगासाठी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चीन रशियाच्या मदतीला धावून गेला आहे.
अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश युक्रेनसोबत आहेत, तर पाकिस्तान आणि चीन हे रशियाच्या बाजुने आहेत. भारतानेही थेट रशियाला पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाला विरोधात जाईल अशी भूमिका घेतलेली नाही. यातच रशिया आणि चीनमध्ये ८ फेब्रुवारीला मोठा करार करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेने लादलेले निर्बंध रशियावर फारसे परिणाम करतील अशी तजवीज पुतीन यांनी आधीच केल्याचे दिसत आहे.
चीनच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टमने गुरुवारी युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच मोठी घोषणा केली आहे. रशिया हा जगातील सर्वाधिक गहू उत्पादक देश आहे. यामुळे रशियाकडून गहू विकत घेण्याचा निर्णय चीनने जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एक करार झालाहोता. यामध्ये चीन रशियाकडून गहू विकत घेईल, त्यावरील निर्बंध हटवेल असे ठरले होते. बॅक्टेरिया आणि कंटेमिनेशनच्या भितीने चीन गहू घेत नव्हता.
करारानुसार, गव्हात बुरशी किंवा दूषित पदार्थ आढळल्यास चीन तात्काळ खरेदी थांबवेल. बुधवारी चीनच्या कृषी मंत्रालयाने सांगितले की, गेल्या वर्षी पेरणीच्या काळात आलेल्या पुरामुळे चीनला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा फायदा रशियाला झाला आहे.