अमेरिका, युरोप देशांची संघटना नाटोला दूर ठेवण्यासाठी रशियाने युक्रेनशी युद्ध छे़डले परंतू असे काही घडलेय की ऱशिया आणि नाटो देशांची लागून असलेली सीमा दुप्पटीने वाढली आहे. रशियाचा शेजारी देश फिनलँड आज नाटोचा भाग होणार आहे. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची चाल त्यांच्यावरच उलटली आहे.
गेल्या ७० वर्षांत नाटोमध्ये सहभागी देशांची संख्या ३० वर गेली आहे. फिनलँडला रशियाने नाटोत न जाण्याची धमकी दिली होती. तरी देखील फिनलँडने नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. फिनलँड आणि स्वीडन दोन्ही देश सैन्याबाबत गटा तटांपासून लांब राहिले होते. परंतू रशियाच्या धमकीनंतर या देशांनी नाटोत जाण्याची घोषणा केली होती. परंतू तुर्कीच्या विरोधामुळे फिनलँडचा अर्ज थांबविण्यात आला होता.
आता नाटोचे महासचिव जेन स्टोल्टेनबर्ग याची अधिकृत घोषणा करणार आहेत. यामुळे युरोपच्या सुरक्षा यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. फिनलँड हा असा देश आहे ज्याच्या सांगण्यावर लाखो लोक सैन्यात येण्यास तयार असतील. स्वीडनचे नौदल खूप ताकदवर आहे. ते नाटोला बाल्टिक समुद्रात ताकद पुरवेल. याचबरोबर महत्वाचे म्हणजे स्वीडन स्वत:ची लढाऊ विमाने बनविते आणि जगालाही पुरविते.
फिनलँड अशासाठी देखील महत्वाचे आहे की रशियाचे जेवढे अब्जाधीश आहेत ते सारे सेंटपीटर्सबर्ग शहरात राहतात, हे शहर सीमेजवळ आहे. त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे या सीमेजवळ रशियाचा अण्वस्त्रांचा साठा आहे. यामुळे नाटोला एक प्रशस्त मार्ग मिळाला असून जर रशियाने काही केलेच तर रशियाचा महत्वाचा भाग तोडण्यास मदत मिळणार आहे. समुद्रातील तेल आणि गॅसचे भांडारही नाटोच्या अधिपत्याखाली येणार आहे.