गेल्या दीड महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. शुक्रवारी रशियाने युक्रेनमधील पूर्वेकडील क्रामाटोर्स्क शहरातील रेल्वे स्टेशनवर रॉकेट हल्ला केला. या अपघातात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांनंतर युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये इमारती, रस्ते आणि वाहतूक उद्धवस्त झाली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत असून, त्याचा जगभरातून निषेध होत आहे.
रशियाचे सैन्य उत्तर युक्रेनमधून पूर्णपणे माघारीदुसरीकडे, ब्रिटनचे संरक्षण मंत्रालयाने आपल्या नवीन अपडेटमध्ये घोषित केले आहे की, रशियन सैन्याने उत्तर युक्रेनमधून बेलारूस आणि रशियाच्या दिशेने पूर्णपणे माघार घेतली आहे. यापैकी, डोनेट्स्क आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रदेशांचा समावेश असलेल्या डॉनबासमध्ये लढण्यासाठी सैन्य पूर्व युक्रेनमध्ये स्थानांतरित केले जाईल. यापैकी बरेचसे सैन्य पूर्वेला तैनात करण्यासाठी आधीपासून तयार राहावे लागेल.
दरम्यान, युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील शहरांमध्ये रशियन गोळीबार सुरू आहे. रशियन सैन्याने मॉस्कोच्या ताब्यात असलेल्या इझियम या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरापासून दक्षिणेकडे कूच केली आहे. बीबीसीने एका रिपोर्ट म्हटले आहे की, उत्तरेकडील कीव्हच्या आसपासच्या भागातून आपले सैन्य मागे घेतल्यानंतर रशियाला आता पूर्व युक्रेनवर कब्जा करायचा आहे.