Russia vs Ukraine War: नशीबवान! युद्ध सुरू असताना युक्रेनचा शेतकरी जंगलात गेला; अब्जाधीश होऊन घरी परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 04:40 PM2022-03-14T16:40:57+5:302022-03-14T16:41:37+5:30

Russia vs Ukraine War: युद्धामुळे युक्रेनचं प्रचंड होत असताना युक्रेनचा एक शेतकरी मात्र त्याच युद्धामुळे अब्जाधीश

ukrainian farmer went to forest amid russian attack and became the billionaire | Russia vs Ukraine War: नशीबवान! युद्ध सुरू असताना युक्रेनचा शेतकरी जंगलात गेला; अब्जाधीश होऊन घरी परतला

Russia vs Ukraine War: नशीबवान! युद्ध सुरू असताना युक्रेनचा शेतकरी जंगलात गेला; अब्जाधीश होऊन घरी परतला

Next

कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. बलाढ्य रशियाचा मुकाबला करताना युक्रेनची वाताहत झाली. युक्रेनमधील अनेक महत्त्वाची शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाची अनेक विमानं, रणगाडे युक्रेनी सैन्यानं उद्ध्वस्त केले आहेत. युद्धानं युक्रेनचं मोठं नुकसान केलं असताना एक शेतकरी मात्र अब्जाधीश झाला आहे.

रशियानं युक्रेनवर हल्ला केला असताना युक्रेनमधला एक शेतकरी जंगलात गेला होता. ज्यावेळी शेतकरी घरी परतला, त्यावेळी तो १५ कोटींचा मालक होता. जंगलात शेतकऱ्याला रशियाचा एक रणगाडा सापडला. हा रणगाडा चोरुन शेतकरी अब्जावधींचा मालक झाला. सध्या या शेतकऱ्याची आसपासच्या गावांमध्ये जोरदार चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत शेतकरी रणगाड्यासोबत दिसत आहे. जंगलात फिरत असताना शेतकऱ्याला रशियाचा रणगाडा दिसला. आसपास रशियाचे सैनिक नव्हते. ते पाहून शेतकऱ्यानं रणगाडा चोरला. आता शेतकऱ्यानं रणगाडा घराबाहेर उभा केला आहे. या रणगाड्याच्या मदतीनं क्षेपणास्त्र हल्ला करता येतो.

शेतकऱ्याचं नाव इगोर आहे. तो सकाळी जंगलात फिरायला गेला. त्यावेळी त्याला रशियन लष्कराचा 9K330 Tor SAM रणगाडा दिसला. शेतकरी रणगाडा घेऊन घरी आला. अब्जावधीचा रणगाडा हाती लागल्यानं एकाएकी शेतकऱ्याचं नशीब पालटलं. रशियानं निर्मिती केलेला हा रणगाडा द टोर नावानं प्रसिद्ध आहे. टोर रणगाडा अतिशय सामर्थ्यशाली असून कोणत्याही परिस्थितीत हल्ले करू शकतो. सर्व ऋतूंमध्ये तो प्रभावी मारा करतो. टोरमधून मध्यम आणि लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रं डागता येतात. जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता टोरमध्ये आहे. टोरच्या मदतीनं हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली जाऊ शकतात.

Web Title: ukrainian farmer went to forest amid russian attack and became the billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.