युक्रेनचे लढाऊ विमान कीवजवळ कोसळले, 14 सैनिकांना घेऊन जात होते विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:17 PM2022-02-24T19:17:20+5:302022-02-24T19:18:24+5:30
Ukraine military plane with 14 aboard crashes : आता युक्रेनमध्ये १४ सैनिकांना घेऊन जाणारे लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे.
राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सैनिकी कारवाईला सुरूवात करत असल्याचं एका व्हिडीओ मेसेजद्वारे घोषित केलं होतं. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात ४० जण मारले गेल्याचे समजते. युक्रेनने देखील रशियाची पाच लढाऊ विमानं व हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. दरम्यान आता युक्रेनमध्ये १४ सैनिकांना घेऊन जाणारे लढाऊ विमान कोसळल्याचे वृत्त आहे.
हे विमान कोसळलं की रशियाने पाडलं का याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. युक्रेनच्या सैन्याने ठिकठिकाणी सपशेल शरणागती पत्करली असून रशियन हवाई दलाने युक्रेनचा अत्यंत महत्वाचा असलेला अंतोनोव्ह आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केल्याचे वृत्त आहे. या विमानतळापासून राजधानी कीव अवघ्या ३३ किमीवर असून रशियाचे सैन्य कीवच्या सीमेवर धडकले आहे.
Ukraine military plane with 14 aboard crashes near Kyiv: AFP News Agency #RussiaUkraineConflict
— ANI (@ANI) February 24, 2022