इस्लामाबाद - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दील घुसून या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जैश ए मोहम्मद्दच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राइक केले होते. दरम्यान, भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळेच दक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी तसेच रशियाने मध्यस्थी करावी, अशी विनवणी पाकिस्तानने केली आहे. दक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि रशियाने मध्यस्थी करावी, असे आवाहन पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी केले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची भाषा करत भारतासमोर चर्चेसाठी हात पुढे केला होता.
तणाव निवळण्यासाठी मध्यस्थी करा, पाकिस्तानची यूनो आणि रशियाला विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 12:43 PM
भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे.
ठळक मुद्देदक्षिण आशियामधील तणाव निवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी तसेच रशियाने मध्यस्थी करावीपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांचे आवाहन