रशियन सैनिकांना का देत आहेत वायग्राच्या गोळ्या? यूएनच्या अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:18 PM2022-10-18T12:18:49+5:302022-10-18T12:19:16+5:30
Russia-Ukraine War : यूक्रेनमधील महिलांसोबत रेप करण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. इतकंच नाही तर रशियन सैनिक महिलांसोबत लहान मुलं आणि पुरूषांचंही शोषण करत आहेत.
Russia-Ukraine War : रशिया आणि यूक्रेनचं युद्ध थांबण्याचं नावही घेत नाहीये. गेल्या दिवसात तर रशियाने यूक्रेनवर अनेक मोठे हल्ले केले. अशात संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. यूएन अधिकाऱ्याने दावा केला की, यूक्रेनमधील महिलांसोबत रेप करण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. इतकंच नाही तर रशियन सैनिक महिलांसोबत लहान मुलं आणि पुरूषांचंही शोषण करत आहेत.
लैंगिक हिंसेबाबत यूएनच्या विशेष प्रतिनिधी प्रामिला पॅटन यांच्यानुसार, यूक्रेनमधील महिलांसोबत बलात्कार करणे आणि त्यांना त्रास होण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्राचा सप्लाय केला जात आहे. पॅटन यांनी दावा केला की, असं यूक्रेनच्या महिलांसोबत मुद्दाम केलं जात आहे. हा रशियन सेनेच्या रणनीतिचा एक भाग आहे.
प्रामिला पॅटन यांनी न्यूज एजन्सी एएफपीला सांगितलं की, जेव्हा महिलांना अनेक दिवस बंधक बनवून रेप केला जात असेल, जेव्हा लहान मुलांना आणि परूषांचं शारीरिक शोषण केलं जात असेल, जेव्हा महिलांना शारीरिक त्रास दिला जात असेल, जेव्हा महिला रशियन सैनिकांकडे वायग्रा असल्याचं सांगत आहेत, तेव्हा हे स्पष्ट आहे की, ही एक सैनिक रणनीति आहे.
पॅटन पुढे म्हणाल्या की, पीडितांनी सांगितलं की, त्यांच्यासोबत रेप करताना काय बोललं जात आहे. त्यावरून हे स्पष्ट होतं की, त्यांच्यासोबत मुद्दामहून हे केलं जात आहे.
त्या म्हणाल्या की, जेव्हापासून रशिया आणि यूक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून 100 पेक्षा जास्त रेप आणि शारीरिक शोषणाच्या घटना समोर आल्या आहेत. ही आकडेवारी कमीच आहे. अनेक घटनांची माहितीच नाही.
पॅटन यांनी सांगितलं की, रशियन सेनेकडून जास्त महिलांचं शोषण केलं जात आहे. धक्कादायक बाब ही आहे की, यात लहान मुले आणि पुरूषांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात यूएनच्या एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला होता की, रशियन सैनिक अनेक लहान मुलांवर रेप करत आहेत आणि त्यांची शिकार झालेला सगळ्यात लहान मुलगा 4 वर्षांचा होता.