न्यू यॉर्क- डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. जेरुसलेमला अशी मान्यता दिल्यास मध्य-पूर्वेत तणाव वाढू शकेल अशी भीती अनेक राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.अमेरिकेने जेरुसलमेला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर सुरक्षा परिषदेतील 15 पैकी 8 सदस्य राष्ट्रांनी याबाबत तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली होती. या देशांनी जगभरातील शांतता व सुरक्षेची स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त करत ही बैठकीची मागणी केली होती.
जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 11:47 AM
डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देअमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले यांनी अमेरिकेची बाजू बैठकीमध्ये जोरदारपणे मांडली. संयुक्त राष्ट्र हे इस्रायलचा द्वेष करणारे एक केंद्र बनलेले आहे. असे सांगत हॅले यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले.