Russia-Ukraine Conflict: “अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 06:31 AM2022-03-01T06:31:51+5:302022-03-01T06:32:30+5:30

Russia-Ukraine Conflict: अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी स्पष्ट केले आहे.

un secretary general antonio guterres said shocking to put russian nuclear forces on high alert | Russia-Ukraine Conflict: “अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव

Russia-Ukraine Conflict: “अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नाही, रशिया-युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा”: UN महासचिव

Next

न्यूयॉर्क: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine Conflict) मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. रशिया आणि युक्रेन यांची बेलारूस येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये रशियाने युक्रेनसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या विविध भागांवर रशियन सैन्याने हल्ले सुरूच ठेवले आहेत. युक्रेनचे सैनिकही त्याला प्रत्युत्तर देत आहे. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लामिदीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी यावर प्रतिक्रिया देताना अणुयुद्धाची कल्पनाही करू शकत नसल्याचे म्हटले आहे. 

रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर ठेवणे हा धक्कादायक घटनाक्रम आहे. अणुयुद्धाची कल्पनाही करता येत नाही. युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेचा फलदायी परिणाम हा संघर्ष थांबवण्याच्या रूपाने होईल, अशी आशा आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. रशिया युक्रेन संघर्षासंदर्भात संयुक्त राष्ट्राने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गुटेरेस यांनी आपले मत मांडले. 

रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबला पाहिजे

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबला पाहिजे. तो देशभर सुरू आहे. या घटनाक्रमामुळे युक्रेनचे संकट आण्विक युद्धात परावर्तित होऊ शकते, अशी भीती आणि चिंता निर्माण झाली आहे, असे सांगितले जात आहे. युक्रेन आताच्या घडीला मोठ्या संघर्षातून जात आहे. त्याच वेळी, आपण आपल्या सर्वांवर संभाव्य विनाशकारी प्रभावांसह मोठ्या प्रादेशिक संकटाचाही सामना करत आहोत. अणुयुद्धाची कल्पनाही करता येत नसून, अण्वस्त्रांचा वापर कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असे ते म्हणाले. याशिवाय, वाढत्या हिंसाचारामुळे लहान मुलांसह सर्वसामान्यांचे होणारे मृत्यू हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आता सैनिकांना परतणे आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी शांतता राखली पाहिजे. सामान्य माणसाच्या हितांचे संरक्षण झालेच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा आणि अखंडतेचा आदर केला पाहिजे. युक्रेनवरील हल्ल्याने आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील बहुपक्षीय व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. प्रादेशिक तणाव वाढत आहे. अनेक दशकांतील युरोपमधील सर्वांत मोठ्या मानवतावादी आणि निर्वासित संकटाचा सामना जगाला होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अमीन अवाद यांची युक्रेनसाठी संयुक्त राष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
 

Web Title: un secretary general antonio guterres said shocking to put russian nuclear forces on high alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.