रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:00 PM2022-03-03T15:00:42+5:302022-03-03T15:02:58+5:30

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशियानं युक्रेन विरुद्ध पुकारलेलं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

unaware of russia vs ukraine war american space engineers stuck in a capsule in moscow | रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

रशियाच्या कॅप्सूलमध्ये कैद आहेत अमेरिकेचे दोन वैज्ञानिक! युद्ध सुरू असल्याची कल्पनाच नाही

Next

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशियानं युक्रेन विरुद्ध पुकारलेलं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. रशियाविरोधात पाश्चिमात्य देश कठोर भूमिका घेत आहेत. अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंधांसोबतच अमेरिकेतील हवाई हद्दीत रशियाच्या विमानांना बंदी घालण्याचाही निर्णय जाहीर केला आहे. पण अमेरिकेचे दोन स्पेस इंजिनिअर रशियाच्या एका अंतराळ कॅप्सूलमध्ये सध्या बंद आहेत. त्यांना पृथ्वीवर सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीची कोणतीही कल्पना नाही. 

अंतरराळात हे वैज्ञानिक नासाकडून सुरू असलेल्या स्पेस एक्सपरिमेंटमध्ये सहभागी आहेत आणि ही मोहिम ८ महिने सुरू राहणार आहे. जिथं एकाबाजूला अमेरिकी नागरिक लवकरात लवकर रशिया सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे अंतराळात शास्त्रज्ञांना या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. 

नासा सध्या अंतराळात एक महत्वाची मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेचं नाव SIRIUS 21 असं आहे. अंतराळवीरांच्या अंतराळातील अनुभवांचा अभ्यास करण्याची ही मोहिम आहे. या प्रयोगाअंतर्गत सहा जणं एका कॅप्सूलमध्ये कैद करण्यात आले आहेत. यात दोन अमेरिकी वैज्ञानिक विलियम ब्राउन आणि एशले कोवाल्स्की यांचा समावेश आहे. त्यांच्यासह तीन रशियन नागरिक आणि संयुक्त अरब अमिरातमधील एक नागरिक कॅप्सूलमध्ये बंद आहेत. 

नासाच्या एका मिशनअंतर्गत हे वैज्ञानिक नोव्हेंबर महिन्यापासून कॅप्सूलमध्ये आहेत आणि ते जुलै २०२२ पर्यंत याच कॅप्सूलमध्ये बंद राहणार आहेत. बाहेरील जगाशी संपर्क करण्याचं त्यांच्याकडे फक्त एकच माध्यम आहे. ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक लेटर्स. प्रयोगात समाविष्ट असलेल्या एका कॉर्डिनेटर द्वारे हे इलेक्ट्रॉनिक्स लेटर्स एका सुरक्षित सर्व्हरवर अपलोड केले जातात. त्यामाध्यमातूनच या वैज्ञानिकांना पृथ्वीशी संपर्क साधता येतो. 

विलियम ब्राउन यांच्या एका सहकाऱ्यानं डेली मेलला दिलेल्या माहितीत युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याआधीच तेथील परिस्थिती बिघडत असल्याबाबत त्यांची ब्राउन यांच्यासोबत चर्चा झाली होती. पण आता रशियानं युद्ध पुकारलं आहे याची माहिती ब्राउन यांना आहे की नाही याबद्दल कोणतीही कल्पना नाही. युद्ध सुरू झाल्याची माहिती कॅप्सूलमधील सहभागी सहा जणांना याची माहिती देण्यात आली आहे की नाही याचीही कल्पना नाही. नासाकडूनही याबाबत चुप्पी साधण्यात आलेली नाही. तसंच हा प्रयोग यापुढील काळात सुरू राहणार की नाही याचीही माहिती देण्यास नकार दिला आहे. 

Web Title: unaware of russia vs ukraine war american space engineers stuck in a capsule in moscow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.