शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

आयुष्यात अनिश्चितता हीच निश्चित असते; मी आता शरणागती पत्करली आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 4:01 AM

मी डोळे मिटून शांतपणे फास्ट ट्रेनमध्ये बसलो होतो. अत्यंत वेगाने जाणाऱ्या रेल्वे प्रवासाचा मला आनंद होता.

लंडन : मी डोळे मिटून शांतपणे फास्ट ट्रेनमध्ये बसलो होतो. अत्यंत वेगाने जाणाऱ्या रेल्वे प्रवासाचा मला आनंद होता. प्रवासामध्ये मी काही स्वप्ने पाहत होतो. माझ्या काही आशा आकांक्षा होत्या. त्या पूर्ण होतील, अशी मला खात्री होती. इतक्यात कोणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी डोळे उघडले आणि पाहिले तर तो होता टीसी. तो मला म्हणाला...तुमचे उतरण्याचे ठिकाण आलेय. आता उतरा खाली... मी त्याला म्हणालो, मला इथे उतरायचे नाही. पुन्हा पुन्हा टीसीला सांगितले. पण तोही मला सतत सांगत होता... हेच तुमचे स्टेशन आहे!आपल्याला जिथे जायचे आहे, त्याआधीच गाडीतून उतरायला सांगितल्यावर कसे वाटेल? माझीही अशीच अवस्था झाली आहे... हे आयुष्याची हतबलता दाखलवणारे उद्गार आहेत प्रख्यात हिंदी अभिनेता इरफान खान याचे. जीवनामध्ये अनिश्चितता हीच केवळ निश्चित असते, असे इरफान खानने ‘टाइम्स आॅफ इंडिया’ला सांगितले आहे.इरफान सध्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने आजारी आहे. अतिशय दुर्मीळ व दुर्धर असा हा कॅन्सर. त्यावर तो उपचार घेत आहे. दुर्मीळ आजार असल्याने डॉक्टरांची औषधोपचारांची दिशाही स्पष्ट नाही. त्यामुळे त्याच्यावर प्रयोग सुरू आहेत. इरफान म्हणतो : मी जणू डॉक्टरांच्या प्रयोगाचा एक हिस्साच बनलो आहे.मी सारी शस्त्रे खाली टाकून आयुष्यापुढे शरणागतीच पत्करली आहे. कॅन्सर झाल्याचे कळल्यामुळे आपले जीवन किती क्षणभंगूर आहे, हे मला पूर्णपणे लक्षात आले आहे. आता मी चिंता करणे बंद केले आहे. पुढच्या दोन वर्षांत वा येत्या काही महिन्यांत काय होणार आहे, हेही मला सांगता येणार नाही. (वृत्तसंस्था)>लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट पाहायला मिळावे, असे माझे बालपणीचे स्वप्न होते. हॉस्पिटलात शिरताना मला काहीही कळत नव्हते, सुचत नव्हते. तिथेच समोर स्टेडियम दिसले. त्यावर व्हिवियन रिचर्ड्सचे मोठे पोस्टर होते, पण मला काहीच वाटले नाही त्याचे. जणू याच्याशी आपला संबंधच नाही... इरफान खान म्हणाला.>उपचारांचे काय फलित असेल, कोणास ठाऊ क, पण मी या साºयापुढे शरण आलो आहे, असे सांगणारा हा अभिनेता आपल्या चाहत्यांचे हमखास आभार मानतो.माहीत असलेल्या, नसलेल्या, ज्यांना ओळखतो, ज्यांना ओळखत नाही, अशा अनेकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल, त्यांच्या सदिच्छांबद्दल तो म्हणतो की, या सदिच्छांच्या आधारेच मी आज लढत आहे. या सर्व चाहत्यांच्या प्रार्थना व सदिच्छा मला आज लढण्याची ताकद देत आहेत.>तुम्हा सर्वांचेआभार>मलान्यूरोएन्डोक्राइनकॅन्सर आहे. न्यूरोएन्डोक्राइन हा शब्द माझ्यासाठी, माझ्या शब्दभांडारासांठी अगदी नवा आहे, असे इरफान खान सांगतो.

टॅग्स :Irfan Khanइरफान खान