Russia Ukraine War: रशियाला धक्का; युक्रेनवरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी होणार, UNHRCचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:44 PM2022-03-04T18:44:32+5:302022-03-04T18:45:23+5:30

युक्रेनवरील हल्ल्याची होणार उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे.

UNHRC vote on establishing independent commission of inquiry on Russia-Ukraine crisis | Russia Ukraine War: रशियाला धक्का; युक्रेनवरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी होणार, UNHRCचा मोठा निर्णय

Russia Ukraine War: रशियाला धक्का; युक्रेनवरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी होणार, UNHRCचा मोठा निर्णय

Next

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता तिसऱ्या फेरीची चर्चा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका, जर्मनी, ब्रिटनसह सर्व देश रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादत आहेत. या निर्बंधांमुळे रशियाच्या चलनात मोठी घसरण झालीय. मात्र हे आर्थिक निर्बंध युद्ध थांबवण्यात कितपत प्रभावी ठरतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने (UNHRC) रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान झालेल्या उल्लंघनाची उच्चस्तरीय चौकशी तयार करण्यासाठी मतदान घेतल्याचे, एएफपीने म्हटले आहे. युक्रेनवरील हल्ल्याची होणार उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. सदर हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रशियाला हा मोठा धक्काच असल्याचं बोललं जात आहे. तसेच भारताने मात्र या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला नाही. 

रशिया आणि युक्रेनमधलं युद्धा आणखीच विद्ध्वंसक होत आहे. रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ताबा मिळवला आहे. यानंतर युरोपपासून अमेरिकेपर्यंत खळबळ माजली आहे. ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. रशियन सैन्याने झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर जोरदार हल्ला केला. यानंतर प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्राला आग लागली. हल्ल्यात प्लांटच्या युनिट १च्या रिअॅक्टर कम्पार्टमेंटचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या प्रकल्प कार्यान्वित नाही परंतु आत न्यक्लिअर फ्यूअल असल्याची माहिती आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. 

दरम्यान, रशियन सैन्यानं एनरहोदर शहरावर हल्ला केला. हे शहर झापोरिझ्झिया पासून अवघ्या काही अंतरावर आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात ६ रिअॅक्टर्स आहेत. हे युरोपमधील सर्वात मोठे, तर पृथ्वीवरील नववे सर्वात मोठे रिअॅक्टर आहेत.  सध्या रशिया या ठिकाणी मोर्टार आणि आरपीजीतून हल्ला करत आहे. अणुऊर्जा केंद्राच्या काही भागांमध्ये सध्या आग लागली असून रशियानं अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.

Web Title: UNHRC vote on establishing independent commission of inquiry on Russia-Ukraine crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.