शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

युद्ध संपविण्यासाठी एकत्र या, भारत तुमच्यासाेबत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 5:54 AM

आम्ही तटस्थ नाही तर शांततेच्या बाजूने : मोदींची ग्वाही

कीव : रशिया, युक्रेनने सध्या सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय भूमिका बजावण्यास तयार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर हे वक्तव्य केले. चर्चेदरम्यान दोन्ही देशांत चार करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांची गळाभेट घेऊन ‘भारत कधीच तटस्थ नव्हता, तर तो नेहमीच शांततेच्या बाजूने होता,’ असे आश्वासक मत व्यक्त केले. युद्ध थांबविण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र यावे, मी भगवान गौतम बुद्धांच्या भूमीतून आलो आहे, जेथे युद्धाला स्थान नाही, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. यावेळी दोन्ही नेत्यांत व्यापार, आर्थिक, संरक्षण, औषधी, कृषी, शिक्षण आदींबाबत चर्चा झाली.

भारत युक्रेनला देणार ‘भीष्म क्यूब’पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन सरकारला शुक्रवारी चार ‘भीष्म क्यूब’ (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग अँड मैत्री) भेट म्हणून देण्याचे जाहीर केले. त्याद्वारे युद्धातील जखमींना तत्काळ प्राथमिक वैद्यकीय मदत करता येणार आहे. ‘भीष्म क्यूब’ म्हणजे वाहून नेता येण्याजोगे छोटे रुग्णालय.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय