वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच हॅली यांनी दक्षिण कॅरिलोना राज्याचं राज्यपालपदही सोडलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हॅली यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे हॅली यांनी ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. हॅली यांनी चांगलं काम केलं आहे. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी मला सांगितलं होतं की, मी विश्रांती घेऊ इच्छिते, असे ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच 2020मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताचंही हॅली यांनी खंडन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही, उलट त्यांच्यासाठीच प्रचार करेन, असंही हॅली यांनी सांगितलं आहे.
संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅलींचा राजीनामा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 10:05 PM