न्यू यॉर्क- म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्यांविरोधात सुरु असणाऱ्या हिंसाचाराला व गोंधळाच्या वातावरणाला तात्काळ शांत करावे असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारला सांगितले आहे. तसेच राखिनमधील लष्करी कारवाईलाही आता आवरते घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला. म्यानमार लष्कराच्या कारवाईमध्ये रोहिंग्यांवर हत्या, स्त्रियांवर बलात्कार, घरे जाळणे अशा प्रकारचे निषेध झाल्यामुळे त्याचीह तीव्र शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्राने निषेध केला आहे आणि रोहिंग्याच्या सुरक्षेप्रती काळजी व्यक्त केली आहे. तसेच म्यानमार सरकारने राखिनमधील लष्करी कारवाई थांबवून तेथे कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी अशा सूचनाही केल्या आहेत. या निवेदनामध्ये मागच्या महिन्यात फ्रान्स आणि इंग्लंडने केलेल्या सुचनांचाही समावेश आहे.
रोहिंग्याविरोधातील हिंसाचार रोखण्यासाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्राचा दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 10:52 AM
सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देआंग सान सू की यांनी गेल्या आठवड्यात उत्तर राखिन प्रांताचा दौरा केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती.आंग सान सू की यांना दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेस्मंड टूटू यांनी पत्र लिहून राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे.