संयुक्त राष्ट्रे : भारतातील १७ दशलक्ष लोक जगभर वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असून त्यातील पाच दशलक्ष लोक आखाती विभागात आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या नव्या अहवालात म्हटले आहे. परदेशांत राहणाºयांच्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. एकट्या सौदी अरेबियामध्ये तब्बल ३२ लाख भारतीय राहतात.मेक्सिको, रशिया, बांगलादेश, सिरिया, चीन, पाकिस्तान आणि युक्रेनमधील लोकही मोठ्या संख्येने परदेशांत राहतात व त्यांची प्रत्येकाची संख्या ६ ते ११ दशलक्षांदरम्यान आहे, असे येथे प्रसिद्ध झालेल्या २०१७ इंटरनॅशनल मायग्रेशन रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. विदेशांत राहणाºया स्थलांतरितांच्या देशांच्या यादीत भारतानंतर मेक्सिको (१३ दशलक्ष) आहे. रशियातून ११, चीन १०, बांगलादेश ७, सिरिया ७ आणि पाकिस्तान व युक्रेन येथील प्रत्येकी ६० लाख लोक आहेत. (वृत्तसंस्था)अमेरिकेतही असंख्य भारतीयभारतातील तीन दशलक्ष लोक संयुक्त अरब अमिरातीत तर अमेरिका व सौदी अरेबियात प्रत्येकी ३२ लाख लोक वास्तव्यास आहेत. विविध देशांतील २५८ दशलक्षलोक त्यांचा मूळ देश सोडून जगभर वास्तव्यास आहेत. सन २००० पासून हे प्रमाण ४९ टक्के वाढले आहे.२०३० सालच्या अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची अंमलबजावणी करण्यात आंतरराष्ट्रीय स्थलांतर हा गंभीर विषय बनला आहे, असे अहवालात म्हटले.
संयुक्त राष्ट्राचा अहवाल : स्थलांतरितांमध्ये भारतीयच सर्वाधिक; सौदी अरेबियात ३२ लाख भारतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:00 AM