ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 1- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रियाधला भेट दिलीय. याभेटीदरम्यान यूएस आणि सौदी अरेबियानं भारतासोबत एकत्रितरीत्या पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा करार झाला आहे. अल कायदा, तालिबान, लष्कर ए तोयबा या संघटनांना मिळणारा पैसा गोठवण्यासाठी भारतासह यूएस आणि सौदी अरेबिया प्रयत्न करणार आहेत. अल कायदा, तालिबान, लष्कर ए तोयबानं अनेक अमेरिकन नागरिकांसह दक्षिण आशिया आणि सौदी अरेबियातील लोकांना हानी पोहोचवल्याची असल्याची माहिती यावेळी दहशतवादविरोधी पथकाचे सचिव अदम सुझबिन यांनी दिलीय. लष्कर ए तोयबाच्या नवीद क्वामर, अब्दुल अजिज नुरिस्तानी, मोहम्मद इझाज सफराश, भारतातल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी उर रेहमान लक्वीवरही कारवाई करण्यात येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अणुकरार झाल्यानंतर रियाधमधून मुक्काम हलवणार आहेत..भारत-युरोप भेटीसाठी बेल्जियमला जाणार आहेत. त्यानंतर ते वॉशिंग्टनलाही भेट देणार आहेत.
दहशतवादाविरोधात अमेरिका, सौदी अरेबिया एकत्र
By admin | Published: April 01, 2016 5:46 PM