गेल्या काही वर्षांत भारतात चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. यामुळे बऱ्याचदा भारतीयाचा डेटा चोरला जात असल्याचेही आरोप झाले आहेत. यावर या कंपन्यांनी तसे करत नसल्याचे स्पष्टही केले आहे. आता या कंपन्या चीनसह भारतात एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरीही एका गोष्टीवरून एकत्र आल्या आहेत.
खरेतर विषय कोरोनाचा नाहीय. अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये अॅपलच्या आयओएससारखा एअरड्रॉप फिचर नाहीय. हे फिचर फाईल ट्रान्स्फर करण्यासाठी वापरले जाते. यासाठी या कंपन्या एकत्र आल्या आहेत. या कंपन्या त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये असे शेअरिंग टूल देतात मात्र, कॉमन टून नसल्याने अन्य कंपन्यांच्या मोबाईलमध्ये फाईल पाठविता येत नाही. लवकरच Android Q ची टेस्टिंग सुरु करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये क्रॉस लेव्हल फाईल शेअरिंग असेल की नाही याची माहिती मिळालेली नाही.
Fast Share नावाचे फिचर आधी पहायला मिळालेले आहे. मात्र, ते सर्व स्मार्टफोनमध्ये दिले जाईल यावर काहीच सांगता येत नाहीय. मात्र, शाओमी, ओप्पो व्हिवोसारख्या कंपन्या मल्टी प्लॅटफॉर्म अँड्रॉईड फाईल ट्रान्सफर प्रणाली विकसित करण्याचा विचार करत आहेत. या कंपन्या मिळून पीटूपी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल विकसित करू शकतात. XDA डेव्हलपर्सने याची माहिती दिली आहे. या कंपन्यांना अन्य कंपन्यादेखील साथ देत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आरबीआय गव्हर्नर आज कोणती घोषणा करणार? थोड्याच वेळात लाईव्ह
चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक
सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ
CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली
सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत