अमेरिकेत एका 20 वर्षीय कॉलेज तरुणीने हॉट डॉग (Hot Dog) खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, याचवेळी तिच्या गळ्यात हॉट डॉग अडकल्याने तिचा गळा बंद झाला. यानंतर तिचा मृत्यू झाला. ही स्पर्धा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. ती याच विद्यापीठात शिकत होती.
रिपोर्टनुसार या 20 वर्षीय मुलीचे नाल मेडलिन निकपॉन (Madelyn 'Madie' Nicpon) आहे. ती टफ्ट्स यूनिवर्सिटी (The Tufts University) मध्ये शिकत होती. गेल्या आठवड्यात या विद्यापीठात हॉट-डॉग ईटिंग कॉम्पिटिशन (Hot-Dog Eating Competition) चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तिने भाग घेतला होता.
मात्र, हॉट डॉग खाताना तिच्या गळ्यात अडकला आणि गळा बंद झाला. यामुळे तिला तातडीने बोस्टन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनीही तिचा जीव वाचू शकला नाही. दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. जर्नल न्यूजने याची बातमी दिली आहे. हॉट-डॉग खाताना अचानक तिला श्वास कोंडल्यासारखे वाटले. यानंतर ती बेशुद्ध झाली. यामुळे तिला हॉस्पिटलला दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे.
मेडलिन ही विद्यापीठामध्ये प्रसिद्ध होती. ती एक चांगली अॅथलिट होती. विद्यापीठाने तिच्या मृत्यूची माहिती दिली आहे. मेडलिन न्यूयॉर्कला राहणारी होती. ती बायोसायकोलॉजीची विद्यार्थिनी होती. मेडलिनच्या मित्रांनी तिच्या कुटुंबासाठी फंड गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर यासाठी आवाहन करण्यात आले आहे. हा फंड तिच्या कुटुंबाला दिला जाणार आहे.