कोरोनाकाळात जगभरातील अनेक लोकांनी नवनवे अनुभव घेतले आहेत. सुरुवातीला लोकांना आपल्या घरातच बंद राहावं लागलं होतं. यामुळे सोशल मीडियावर अर्बन एक्सप्लोरर्सची (Urban Explorers) संख्या प्रचंड वाढली. हे लोक जगातील त्या ठिकाणी जातात ज्या लोकांच्या नजरेत आलेल्या नसतात. यानंतर तिथले फोटो काढून लोकांसोबत शेअर करतात. अशाच एका अर्बन एक्स्प्लोरर डेनिअल सिम्सने अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. हे घर अनेक वर्षांपासून बंद होतं. जेव्हा डेनिअल या घरात गेले तेव्हा त्यांना असं वाटू लागलं जणू वेळ थांबली आहे.
हे सुनसान घर यूकेच्या यॉर्कशायरमध्ये (Yorkshire) आढळलं. इंग्लंडच्या हॅडर्सफिल्डमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय डेनिअलची नजर या घरावर पडली होती. खूप आधी त्यांनी या घराबद्दल इतर अर्बन एक्सप्लोरर्सकडून ऐकलं होतं. तेव्हापासून याठिकाणी भेट देण्याची त्याची इच्छा होती. या घराचे दरवाजे उघडल्यानंतर काही वेळ तेदेखील मागील काळातच गेले. त्यांनी या संपूर्ण घराचा व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनेलवर (Video on Youtube Channel) शेअर केला.
डेली मेलच्या वृत्तानुसार, घरातील एक रूममध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेलं सामान जशाच्या तशा अवस्थेत दिसलं. घराच्या लिव्हिंग रूममध्ये अनेक वर्षांपूर्वीच वृत्तपत्र आढळलं. सोबतच तिथे अनेक अँटिक वस्तू आढळल्या. रूममध्ये एक जुनी साऊंड सिस्टिमही आढळली. किचनमध्ये हा व्यक्ती गेला असता तिथे एका भांड्यात पाणी होतं. असं वाटत होतं की जणू कोणीतरी चहा बनवण्याची तयारी करत होतं. मात्र चहा बनवण्याआधीच त्याला हे घर सोडावं लागलं. किचनमध्ये अनेक भांडी पडलेली होती.
घराच्या बाथरूममध्ये डेनिअलला अनेक टूथब्रश आढळले. यातील प्रोडक्ट एक्सपायर झालेले होते. यातून हे लक्षात येतं की घरात राहणाऱ्या महिलेला मेकअपची आवड होती. सोबतच घरात अनेक प्रकारच्या बाहुल्याही मिळाल्या. यावरुन घरात लहान मुलंही होती, असं जाणवलं. डेनिअलला हे घर अतिशय भीतीदायक वाटलं (Scary House). घराच्या बेसमेंटमध्ये जाताच डेनिअल हैराण झाला. तिथे अनेक प्रकारचे अँटीक ठेवले होते. ज्याची किंमत मार्केटमध्ये लाखो रूपये आहे.