वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावले आहे. या निर्णयाचे व्हाइट हाऊसने जोरदार समर्थन केले आहे. चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गमवावे लागले आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसने दिली आहे.चीनने बेकायदेशीर मार्गांनी अमेरिकी बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.चीनमधून येणाºया वस्तूंवर ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिकी बौद्धिक संपदेची चीनकडून होत असलेल्या चोरीबाबत चौकशीनंतर आलेल्या अहवालाच्या आधारे हे शुल्क लावण्यात आले. व्हाइट हाऊसच्या प्रशासकीय अधिकाºयाने सांगितले की, एक अब्ज व्यापार तुटीमागे ६ हजार रोजगार गमवावे लागतात. काही अंदाजानुसार, आमच्या व्यापार तुटीमुळे चीनमध्ये २ दशलक्ष नवे रोजगार निर्माण होतात. (वृत्तसंस्था)बीजिंग : अमेरिकेने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात शुल्क लावणार आहे. अमेरिकी वस्तूंची एक यादी चीनने तयार केली आहे. त्यात डुकराचे मांस, सफरचंदे आणि स्टील पाईप यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने तडजोडीसाठी वॉशिंग्टनशी संपर्कही केला आहे. अमेरिकेच्या निर्णयामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेलाच सुरुंग लावला आहे, असे चिनी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.भांडवली बाजाराला बसेल फटका : ‘ट्रेड वॉर’मुळे बाजारातील आर्थिक तरलता धोक्यात येत आहे. या तरलतेमुळेच विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारातून पैसा काढून घेण्याची शक्यता आहे.भारतावर होणार नाही परिणामअमेरिकेने आयातीवर लावलेल्या करांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होण्याची फार शक्यता नाही. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यवहारात भारताची व्यापारी तूट १.९ टक्के आहे.पण अमेरिकेच्या आयात देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानी आहे. यामुळे या ‘ट्रेड वॉर’ भारतावर थेट परिणाम होणार नाहीच. उलट येत्या काळात व्यापारी तूट आणखी ३ अब्ज डॉलरपर्यंत कमी होण्याची आशा आहे.या देशांना मात्र अमेरिकेने वगळलेआयात शुल्क वाढीच्या कारवाईतून अमेरिकेने युरोपीय देश, बिटन, आॅस्ट्रेलिया, ब्राझिल, दक्षिण कोरिया अशा काही देशांना वगळले आहे. याआधी अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांनाही शुल्कवाढीतून दिलासा दिला होता.
चीनसोबत अमेरिकेने छेडले व्यापार युद्ध, ड्रॅगनवर लादले ६0 अब्ज डॉलरचे शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 2:37 AM