कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये हजारो भारतीय नागरिक अडकून पडले. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत मिशन घेण्यात आले. त्यानुसार विविध देशांतून विशेष विमानाने त्यांना परत आणले जात आहे. मात्र अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या उड्डाणांना मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकेच्या परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशानूसार, अमेरिकेने एअर इंडियाद्वारे सुरु असलेल्या वंदे भारत मिशनच्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहे. भारताने विमान उड्डाणांची आगाऊ परवानगी घ्यावी, अशी अट अमेरिकेकडून घालण्यात आली आहे. तसेच भारत आणि अमेरिका दरम्यान हवाई वाहतूक सेवांबद्दल भारत सरकार "अन्यायकारक आणि भेदभावशील" असल्याचा आरोपही केला आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे दिल्ली आणि वॉशिंग्टन दरम्यान सुरु असलेल्या विमान सेवेला मोठा फटका बसणार आहे.
जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध देशांत अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने 'वंदे भारत मिशन' मोहीम ७ मे २०२० पासून सुरू केली आहे.
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस 'वंदे भारत मिशन' अंतर्गत १२ देशांमध्ये ६४ विमान उड्डाणे करीत आहे. यामध्ये एअर इंडियाची ४२ उड्डाणे आणि २४ उड्डाणे एअर इंडिया एक्स्प्रेस करत आहे. या १२ देशांमध्ये अमेरिका, लंडन, बांगलादेश, सिंगापूर, सौदी अरेबिया, कुवैत, फिलिपिन्स, युएई आणि मलेशियाचा समावेश आहे.
CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...