US Bioweapons Ukraine: युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक शस्त्रांची निर्मिती?, रशियानं विचारला जाब; चीनचाही संताप!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:01 PM2022-03-09T14:01:09+5:302022-03-09T14:02:03+5:30
रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यापासूनच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनमध्ये अमेरिका जैविक शस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करत आले आहेत.
मॉस्को-
रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यापासूनच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनमध्ये अमेरिका जैविक शस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करत आले आहेत. अमेरिकेनं युक्रेनमध्ये जैव शस्त्रास्त्र तयार करण्यासाठीची अनेक प्रयोगशाळा उभारल्याचा आरोप रशियानं केला आहे. तसंच जैविक संशोधन केंद्रे रशियाच्या हातात पडू नयेत यासाठी अमेरिका युक्रेनसोबत काम करत असल्याचं विधान अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी केलं होतं. युक्रेनमध्ये जैविक प्रयोगशाळा असल्याच्या पुष्टीमुळे आता खळबळ उडाली आहे. रशिया आणि चीनने अमेरिकेकडे यावक उत्तर मागितलं आहे.
युक्रेनमधील जैविक शस्त्रास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तथ्यांच्या पुष्टीमुळे आम्ही चिंतेत आहोत, असं अमेरिकेतील रशियन राजदूत अनातोली अँटोनोव्ह म्हणाले. "परराष्ट्र विभागाच्या प्रतिनिधींच्या विधानातून अमेरिकेला वाटत असलेली भीती दाखवून देते की युक्रेनमध्ये त्यांनी प्रयोगशाळा निर्माण केल्या आहेत", असं रशियन राजदूत अँटोनोव्ह म्हणाले.
युक्रेनमध्ये 30 हून अधिक प्रयोगशाळा: रशिया
"प्लेग, अँथ्रॅक्स, टुलेरेमिया, कॉलरा आणि इतर प्राणघातक रोगांसह विशेषतः धोकादायक रोगजनकांच्या जैव शस्त्रांची माहिती समोर आलेली आहे", असं अँटोनोव्ह म्हणाले. रशियाने यापूर्वी सांगितले होते की लविवि, खारकोव्ह आणि पोल्टावा येथील 30 हून अधिक प्रयोगशाळा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी जैविक कार्यक्रमांतर्गत धोकादायक संसर्गजन्य एजंट्सवर काम करत आहेत.
U.S. Under Secretary of State Victoria Nuland says Washington is working with Ukraine to prevent biological research facilities from falling into Russian hands. She just confirmed every conspiracy theory about the existence of those labs. pic.twitter.com/ynkd7hW6iK
— Ian Miles Cheong (@stillgray) March 8, 2022
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील पेंटागॉनच्या कथित जैविक प्रयोगशाळांची माहिती लवकरात लवकर उघड करण्याचे आवाहन अमेरिकेला केले आहे. रशियन सैन्याने सोमवारी सांगितले की युक्रेनियन अधिकारी या प्रयोगशाळांमध्ये अभ्यासलेल्या रोगजनकांचा नाश करत आहेत, आरटीने अहवाल दिला. यूएस-अनुदानित 30 युक्रेनियन बायोलॅब यूएस सैन्याला सक्रियपणे सहकार्य करत आहेत. मात्र, युक्रेनने बायो-वेपन विकसित करण्यास नकार दिला आहे, असा दावा रशियानं केला आहे.
युक्रेनमधील प्रयोगशाळा हिमनगाचे फक्त टोक: चीन
कीव्हमधील यूएस दूतावासाच्या वेबसाइटनुसार, यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स बायोलॉजिकल थ्रेट रिडक्शन प्रोग्राम संसर्गजन्य रोगांच्या उद्रेकाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भागीदार देशांनाच सहकार्य करतो. 2020 मध्ये, दूतावासाने युक्रेनमधील यूएस-अनुदानित बायोलॅबबद्दल अशा सिद्धांतांना व्यत्यय आणणारे म्हटले होते. "युक्रेनमधील प्रयोगशाळा केवळ हिमखंडाचे एक टोक आहे आणि अमेरिकेचे संरक्षण विभाग जगभरातील 30 देशांमध्ये तब्बल ३३६ जैविक प्रयोगशाळांचं नियमन करत आहे", असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केला आहे.