वॉशिंग्टन- 1983 साली अमेरिकेच्या हवाई दलातील नोकरी कोणालाही न सांगता सोडून गायब होणाऱ्या अधिकाऱ्यास पकड़ण्यात अमेरिकन तपास यंत्रणांना यश आले आहे. आपल्याला नैराश्य आल्यामुळे हवाई दलाची नोकरी सोडली होती असं या अधिकाऱ्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.विल्यम हॉवर्ड ह्युजेस ज्युनियर असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमेरिकेच्या हवाई दलामध्ये तो कार्यरत होता. मात्र आता अटक होताना मात्र एका बनावट पासपोर्ट प्रकरणामुळे तो विशेष तपासणी पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका पासपोर्ट प्रकरणात चौकशी करताना विल्यमची ओळख पटली व त्याला अटक झाली.
35 वर्षांनी सापडला हवाई दलाच्या कर्तव्याला कंटाळून पळून जाणारा अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 12:38 PM