ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ३० - अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अन्य देशांच्या हवाई दलांनी बुधवारी इराकच्या फालुजा शहरावर जोरदार हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यात इसिसचे २५० अतिरेकी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून ४० वाहने नष्ट झाली आहेत. अमेरिकी अधिका-यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
या आकडयाला अधिकृत पृष्टी मिळाली तर, इसिस विरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरेल. फालुजा शहराच्या दक्षिणेकडच्या भागातून नागरीक मोठया प्रमाणावर विस्थापित झाले असून या भागाला युध्दभूमीचे स्वरुप आले आहे.
सिरिया आणि इराकमध्ये अमेरिकेला इसिस विरोधात मोठया प्रमाणात यश मिळत आहे. फालुजामध्ये इसिसवर विजय मिळवल्याचे स्थानिक सरकारने जाहीर केले आहे.
मंगळवारी टर्कीच्या इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ३६ जण ठार तर शेकडो जखमी झाले. बॉम्बस्फोट घडवणारे इसिसचे आत्मघातकी हल्लेखोर होते असा टर्कीचा दावा आहे. मार्च महिन्यात ब्रसेल्स विमानतळावर बॉम्बस्फोट झाले तशाच पद्धतीचा हा हल्ला होता.