शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या दादागिरीविरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 5:58 PM

दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटावर सैन्यीकरणाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं विरोध दर्शवला आहे

मनिला, दि. 7 - दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटावर सैन्यीकरणाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं विरोध दर्शवला आहे. तसेच दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांनीही चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त कृत्रिम बेटावरील वाढत्या बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. चीन या कृत्रिम बेटाचा लष्करासाठी वापर करून दक्षिण चिनी समुद्रावर मालकी हक्क करू शकतो, या भीतीपायी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं चीनला विरोध केला आहे. शेजारील देशांनी दक्षिण चिनी समुद्राच्या वादात पडू नये, असा चीनचा आग्रह आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई म्हणाले, बाहेरील पक्षांनी या वादात हस्तक्षेप केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. चीननं जवळपासच्या सर्वच समुद्रांवर स्वतःचा दावा केला आहे. चीनच्या समुद्राच्या मार्गे जवळपास 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा अफाट तेल आणि वायूच्या देवाणघेवाणीचा व्यापार करते. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रां(आसियान)तील फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेईसह इतर 10 सदस्यांनी चीनच्या दक्षिण चीन समुद्रावरील मालकी हक्काला विरोध केला आहे. विशेष म्हणजे यात तैवानचाही समावेश आहे. पण अलिकडच्या काळात चीननं आसियान राष्ट्रांची विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवलं आहे. दक्षिण चिनी समुद्राचं कायदेशीररीत्या वाटप झालं नाही. त्यामुळे शेजारील देशांनी चीनला विरोध करणं ही आचारसंहिता भंग ठरू शकते, असं चीननं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यानंतरही अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं चीनला विरोध केला आहे.   गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण चीन समुद्रात चीनने बांधलेल्या कृत्रिम बेटाजवळ अमेरिकन नौदलाचे युद्धजहाज येऊन धडकल्याने दोन्ही देशांत तणाव वाढला होता. गस्ती मोहिमेवर असलेले अमेरिकेचे युद्धजहाज चीनच्या कृत्रिम बेटाजवळून गेले होते. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे संभाळल्यानंतर प्रथमच अमेरिकन नौदलाने दक्षिण चीनच्या सागरामध्ये चीनला अशा प्रकारे थेट आव्हान दिले होते. सध्या दक्षिण चीनच्या समुद्राच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनने आपला हक्क सांगितला आहे. पण चीनची ही दादागिरी शेजारी देशांना अजिबात मान्य नाही. मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय कोर्टाने या प्रकरणी चीनच्या विरोधात निकाल दिला होता. संपूर्ण दक्षिण चीन सागर चीनच्या मालकीचा नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले होते. पण चीनला हा निकाल मान्य नाही. मालकी निर्माण करण्यासाठी दक्षिण समुद्रात चीनने छोटीछोटी कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे. दक्षिण चीन समुद्रात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने चीनने ही दादागिरी चालवली आहे. अमेरिकेला चीनची ही अरेरावी अजिबात मान्य नसून, अमेरिकेनेही दक्षिण चीन सागरातील आपला वावर वाढवला आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन चीन या कृत्रिम बेटांवर लष्करी सुसज्जताही वाढवत चालला आहे. 

अमेरिका-चीन संबंध ट्रम्प येण्याआधीही अमेरिकन नौदलाने दक्षिण चिनी समुद्रात अनेक गस्ती मोहिमा राबवल्या आहेत. त्या सर्व मोहिमांना तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मंजुरी होती. ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि तैवान या देशांचा चीनला कडाडून विरोध आहे. सध्याच्या अमेरिकेच्या गस्ती मोहिमेमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढणार आहे.