वॉशिंग्टन - अमेरिकन सरकारने चीनमधील अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना, तसेच कुटुंबातील सदस्यांना आणि सुरक्षा पुरवण्यात आलेल्या कंत्राटदारांना चिनी नागरिकांबरोबर कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी)ला याबद्दल माहिती मिळाली आहे.
या प्रकरणाची माहिती असलेल्या चार जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एपीला या धोरणाबद्दल सांगितले. हे धोरण जानेवारीमध्ये अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांनी चीन सोडण्यापूर्वी लागू करण्यात आले होते.
एजन्सींचे नियम कडककाही अमेरिकन एजन्सींनी अशा संबंधांबाबत आधीच कडक नियम लागू केले आहेत. तथापि, इतर देशांमधील अमेरिकन राजदूतांसाठी स्थानिक लोकांशी डेट करणे आणि लग्न करणे असामान्य नाही.
चीनबाहेरील अमेरिकन कर्मचाऱ्यांसाठी नियम नाहीनवीन धोरणात मुख्य भूमी चीनमधील अमेरिकन मिशन्सचा समावेश आहे, ज्यामध्ये बीजिंगमधील दूतावास आणि ग्वांगझू, शांघाय, शेनयांग आणि वुहानमधील वाणिज्य दूतावास, तसेच हाँगकाँगच्या अर्ध-स्वायत्त प्रदेशातील अमेरिकन वाणिज्य दूतावासांचा समावेश आहे. हे नियम चीनबाहेर तैनात असलेल्या अमेरिकन कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.
नवीन धोरणावर गेल्या उन्हाळ्यात प्रथम चर्चा गेल्या उन्हाळ्यात मर्यादित स्वरूपात हे धोरण लागू करण्यात आले होते. या धोरणानुसार, अमेरिकन कर्मचाऱ्यांना चीनमधील अमेरिकन दूतावास आणि पाच वाणिज्य दूतावासांमध्ये रक्षक आणि इतर सहायक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या चिनी नागरिकांशी ‘रोमँटिक आणि लैंगिक संबंध’ ठेवण्यास मनाई होती, असेही सांगण्यात आले.