अमेरिकेत (America Crime News) राहणाऱ्या एका व्यक्तीने आधी भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासली. तो नातं विसरून बहिणीसोबत संबंध ठेवत होता आणि जेव्हा त्याला समजलं की, बहिणीचे दुसऱ्या पुरूषासोबत संबंध आहे तर संतापून त्याने बहिणीची हत्या (Brother Killed Sister) केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोप गेल्या काही वर्षापासून बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, ३२ वर्षीय जोस मॅनुअल गुजमॅनला अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आपल्या बहिणीची बेसबॉल बॅटने हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोपी गुजमॅन ग्वाटेमालामध्ये जन्माला आला होता. नंतर तो टेक्सासमध्ये शिफ्ट झाला होता. नात्याने भाऊ-बहिण असूनही दोघांमध्ये शारीरिक संबंध होते.
पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा भावाला समजलं की, त्याच्या बहिणी त्याच्या मित्रासोबतही संबंध ठेवले होते. तेव्हा संतापला होता. हत्या करण्याआधी त्याने बहिणीला बेदम मारहाण केली होती. बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपीने आपल्या आईला घटनेची पूर्ण माहिती दिली. त्यानंतर तिने लगेच पोलिसांना हे कळवलं.
पोलीस सूचना मिळाल्यावर जेव्हा आरोपीच्या घरी गेले तेव्हा घरात सगळीकडे रक्तच रक्त होतं. पण आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपीने कबूल केलं की, त्याने त्याच्या बहिणीची हत्या केली. त्याने सांगितलं की, बहिणीने त्याच्या मित्रासोबत संबंध ठेवले होते. ज्यामुळे तो संतापला. त्याने बेसबॉल बॅटने बहिणीची हत्या केली.