इस्रायल-हमास युद्धावर अमेरिकेच्या भूमिकेवरून अल-कायदा या दहशतवादी संघटनेने उद्योजक एलोन मस्क, बिल गेट्स आणि सत्या नाडेला यांची हत्या करण्याची आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनं अल-कायदाशी संबंधित चॅटरूम्सच्या मेसेजचा रिव्यू केला. ज्यामध्ये दहशतवादी संघटनेने आपल्या समर्थकांना अमेरिका, ब्रिटन आणि फ्रेंच कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्या फ्लाइटवर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे. या यादीत अमेरिकन एअरलाइन्स, कॉन्टिनेंटल, डेल्टा, ब्रिटिश एअरवेज, एअर फ्रान्स आणि एअर फ्रान्स-केएलएम यांचा समावेश आहे.
अल कायदाची मीडिया शाखा अल मालाहेम यांनी म्हटलंय की, अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांनी इस्त्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्याचे समर्थन केल्यामुळे ते टार्गेटवर आले आहेत. गाझा येथील हल्ल्यात २० हजाराहून लोकांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे फिलिस्तीनच्या समर्थनासाठी ओपन सोर्स जिहाद यांच्याकडे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावर महत्त्वाकांक्षी मुजाहिद्दीनला खाद्य सामानाचा वापर करून एडवांस्ड बॉम्ब बनवण्यासाठी सूचना केली आहे.
दहशतवाद्यांच्या निशाण्यावर एलन मस्क, बिल गेट्स आणि माजी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अध्यक्ष बेन बर्नानके आहेत. बेन बर्नानके एक यहूदी आहेत आणि त्यांचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर चांगला प्रभाव आहे. या व्हिडिओत माइक्रोसॉफ्टचे बिल गेट्सच्या कार्यकाळातील जुने भाषण दाखवले. त्यात भारतीय मूळ असलेले सत्या नडेला आणि माजी सीईओ स्टीव बाल्मर यांनाही टार्गेट करण्याचं आवाहन केले आहे. हा व्हिडिओ अल कायदाकडून ३१ डिसेंबरला जारी केला होता. अल कायदाचा ओपन सोर्स जिहाद अभियान हा विद्रोही साहित्याच्या माध्यमातून मुस्लीमांना आकर्षिक करून त्यांना स्फोटकं बनवण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग दिले जाते. त्याचसोबत सुसाईड बॉम्बर म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
ओपन सोर्स जिहाद हा शब्द जुलै २०१० मध्ये पहिल्यांदा अल मालाहेमद्वारे त्यांच्या इंग्रजी पत्रिकेत आढळला होता. या व्हिडिओत इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेनसह जागतिक नेत्यांसोबत भेट घेताना दाखवले आहे. त्याचसोबत पाश्चिमात्य देशांवर इस्लामविरोधात युद्धात हातमिळवणी केल्याचा आरोप आहे. अल कायदाने व्हिडिओ आत्मघातकी हल्लेखोर हसन अल असीरीचं उदाहरण दिले आहे. ज्यानं सौदी अरबचे उपमंत्री मोहम्मद बिन नायेफ यांना टार्गेट केले होते. त्यात डेल्टा विमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा अल फारुख याच्याबद्दलही बोलले गेले.