अमेरिकेच्या अध्यक्षीय ( President) निवडणुकीच्या निकालावरून अजूनही राजकीय पेच सुरूच आहे. २०२० झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांचा पराभव झाला. पण, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करत दबाव आणला जात होता. यात डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी (Donald Trump supporters) व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगबाहेर जमावानं धुडगूस घातला. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये ( WashingtonDC) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५२ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण, या सर्व प्रकारात एकानं अमेरिकेच्या संसदेबाहेर फ्राईजचा स्टॉट थाटल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ( Someone started selling fries during protest at US Capitol)
फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.