वॉशिंग्टन : पाकिस्तानला संरक्षणविषयक साह्य देण्यासाठीच्या अटी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने आणखी कठोर केल्या आहेत. आर्थिक मदत देण्यापूर्वी पाकने दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत समाधानकारक प्रगती दाखवायला हवी, अशीही अट त्यात आहे. संसदेने विधेयक मंजूर केले आहे. दहशतवादाला पाककडून समर्थन मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या अटी टाकण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या अधिकारी आणि संसद सदस्यांनी यापूर्वीही या विषयावर काळजी व्यक्त केली होती. मंजूर विधेयकानुसार, संरक्षण मंत्र्यांना पाकिस्तानला आर्थिक सहाय्य देण्यापूर्वी हे प्रमाणित करावे लागेल की, पाकिस्तान ग्राउंडस लाइन्स आॅफ कम्युनिकेशनवर (जीएलओसी)सुरक्षा ठेवून आहे. संरक्षण मंत्र्यांना हे प्रमाणित करावे लागेल की, पाकिस्तान हक्कानी नेटवर्कला उत्तर वजिरिस्तान भागात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. अफगाणिस्त सीमेवर हक्कानी नेटवर्कसह अतिरेकी संघटनांच्या कारवायांवर लगाम लावण्यात पाकिस्तान अफगाणिस्तान सरकारच्या सोबत आहे, हे दाखवून द्यावे लागेल. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानला अर्थसाह्यासाठी अमेरिकेच्या अटी
By admin | Published: July 16, 2017 1:52 AM