शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
5
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
6
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
7
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
8
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
9
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
10
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
11
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
12
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
13
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
14
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
15
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
16
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
17
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
18
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
19
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
20
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

एन्ड क्लायंटसाठी काम करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 5:50 AM

काही वेळा कंपनी एखाद्या तात्पुरत्या कर्मचाऱ्याला त्रयस्थ पक्षासाठी किंवा एन्ड-क्लायंटसाठी नेमू शकते.

प्रश्न - मी एच १ बी तात्पुरत्या व्हिसाचा अर्जदार आहे. माझ्या कंपनीने मला एन्ड क्लायंटला सेवा देण्यास सांगितले आहे. मात्र, ज्या एन्ड क्लायंटसाठी मी काम करत आहे, ती कंपनी एन्ड क्लायंट असल्याचे पत्र त्यांच्या कंपनीची पॉलिसी म्हणून देत नाहीत. मी एन्ड-क्लायंट कागदपत्रे सादर करू शकत नाही हे मी कॉन्सुलर ऑफिसरला सांगावे का, मी अन्य काही पुरवणी कागदपत्रे सादर करू शकतो का ?उत्तर - काही वेळा कंपनी एखाद्या तात्पुरत्या कर्मचाऱ्याला त्रयस्थ पक्षासाठी किंवा एन्ड-क्लायंटसाठी नेमू शकते. तुम्ही, तुम्हाला पाठविणारी कंपनी आणि तुमचा एन्ड क्लायंट (जर लागू असेल तर) यांचे नाते खरे असण्यासंदर्भात तुम्हाला कौन्सुलर अधिकाऱ्याच्या समाधानास पात्र ठरावे लागेल. तुमचे हे नाते सिद्ध करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. जर तुमचा एन्ड क्लायंट तुमच्या नोकरी निश्चितीचे पत्र जर त्याच्या लेटरहेडवर देत नसेल तर, कृपया तुमचे नाते खात्रीचे असल्याचे सिद्ध होईल असे तुम्हाला वाटते ते कोणतेही पुरवणी कागदपत्र घेऊन या. 

या पुरवणी कागदपत्रामध्ये कंपनी आणि एन्ड क्लायंट यांच्यातील मास्टर सर्व्हिस अग्रीमेंट (एसएसए) किंवा कंपनी आणि मध्यस्थ, ज्याचे एन्ड क्लायंटसोबत नाते आहे, अशा पुरवणी कागदपत्रांचा समावेश असू शकतो. तुम्ही वर्क सर्व्हिस अग्रीमेंट, टाईम शीट्स किंवा एन्ड क्लायंटकडे तुमची नोकरी खरे असल्याचे सिद्ध होईल असे कोणतेही कागदपत्र सादर करू शकता.

व्हिसा मुलाखतीच्या दरम्यान, एच १ बी व्हिसा अर्जदाराने त्यांची कंपनीतील नोकरी / किंवा एन्ड क्लायंटकडील नोकरी, कामाचे स्वरूप याची तोंडी आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपात तपशीलात माहिती देणे गरजेचे आहे. 

कॉन्सुलर अधिकाऱ्यासोबत तुमच्या पदानुसार तुमच्या कामाची कार्यकक्षा, कंपनीच्या कामातील तुमच्या पदाचे स्थान, तुमचा पगार किती असेल आदींची चर्चा करण्यासाठी सक्षम असायला हवे. तुम्ही अमेरिकेत कुठून काम करणार आहात, आणि जर तुम्ही कंपनी (अथवा एन्ड क्लायंट)च्या कार्यालयातून काम करणार असाल, किंवा जर तुम्ही घरातून काम करणार असाल, जरी अमेरिकेतील दुसऱ्या राज्यात तुमचे घर असेल तिथून,तरी कॉन्सुल अधिकाऱ्याला याची माहिती विशद करण्याची तयारी ठेवावी. 

तुमच्या नोकरीचा तपशील सुस्पष्ट असावा आणि त्यात कोणतीही गुंतागुंत नसावी. आपली दैनंदिन कामे कॉन्सुलर अधिकाऱ्याला समजेल, अशी सांगावी. 

NOTE: The best place to find answers to your visa and general consular questions is athttp://www.ustraveldocs.com/in. In this column we do not respond to or comment on questions related to specific visa cases or refusals. We will, however, answer general questions about visas and items of general interest. If you have specific visa case questions, please contactsupport-india@ustraveldocs.com. Also, please note that all U.S. visa applicants with an application ID or case number can now check the status of their submitted visa applications by visitinghttp://ceac.state.gov/ceac 

महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/inया कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support india@ustraveldocs.comवर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटसhttp://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचंwww.facebook.com/Mumbai.USConsulateपेज लाईक करा. तर ट्विटरसाठीhttp://twitter.com/USAndMumbaiक्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :Visaव्हिसाUSअमेरिका