शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

अमेरिकेतील न्यायालयाने मोदींना जारी केले समन्स

By admin | Published: September 27, 2014 6:56 AM

चार दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या एक दिवस आधी येथील एका न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहे.

न्यूयॉर्क : चार दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या एक दिवस आधी येथील एका न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहे.गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या संदर्भात ‘अमेरिकन जस्टिस सेंटर’ या एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्याच्या संघीय न्यायालयाने हे समन्स जारी केले. दोन दंगलग्रस्तांच्या वतीने हा दावा दाखल केला गेला आहे. या दंगलींच्या काळात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते व त्या नात्याने त्यांना दाव्यात प्रतिवादी केले गेले आहे.वादींचे वकील गुरपतवंत सिंग पन्नुन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे समन्स बजावले गेल्यापासून २१ दिवसांत मोदी यांनी न्यायालयात आपले म्हणणे दाखल करणे गरजेचे असेल. तसे न केल्यास मोदी यांचा बचाव विचारात न घेता दाव्याचा एकतर्फी निकाल केला जाईल, असेही समन्समध्ये नमूद केले गेले आहे.गुजरातमधील २००२ च्या दंगली हा मुस्लिमांचा पद्धतशीरपणे केलेला नरसंहार होता व याची जबाबदारी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदींवर येते. मानवतेविरुद्ध झालेल्या या गुन्ह्यांचा ठपका मोदींवर ठेवून शक्य झाल्यास त्यांच्याकडून दंगलग्रस्तांसाठी भरपाईही वसूल करावी, अशी विनंती वादींनी त्यांच्या २८ पानी दाव्यात केली आहे.(वृत्तसंस्था)