वॉशिंग्टन : अमेरिकी काँग्रेसने 2क्15 मध्ये पाकिस्तानला देण्यात येणा:या आर्थिक साहाय्यात 6.58 कोटी डॉलरची कपात केली असल्याचे अधिकृत सूत्रंनी सांगितले.
परराष्ट्र विभागाच्या वर्ष 2क्15 साठीच्या 48.258 अब्ज डॉलरच्या अर्थसंकल्पाला मान्यता देताना शक्तिशाली सिनेट कमिटी ऑन अॅप्रोप्रिएशन्सने पाकला 95.97 कोटी डॉलरचे अर्थसाहाय्य मंजूर केले आहे.
ओबामांनी पाकसाठी 1.क्3 अब्ज डॉलरच्या अर्थसाहाय्याचा आग्रह धरला होता. ही रक्कम त्याहून 6.58 कोटींनी कमी आहे. समितीने पोलिओ निमरूलन कार्यक्रमाचा निधी वाढवून 5.9 कोटी डॉलर केला आहे. यात अफगाणिस्तान व पाकिस्तानातून हा रोग हद्दपार करण्यासाठीच्या 75 लाख डॉलरच्या निधीचा समावेश आहे. हा निधी 9क् लाख डॉलर ठेवण्यात यावा, असा आग्रह ओबामांचा होता.
याशिवाय समितीने परराष्ट्र मंत्र्यांकडे स्पेशल रिप्रेङोंटेशन फॉर अफगाणिस्तान अँड पाकिस्तान हे कार्यालय दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार विभागाच्या अंतर्गत आणण्याचा आग्रह धरला आहे. पाकमधील बेरोजगारी, असाक्षरता यासारख्या मूलभूत विषयांकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देशही या समितीने दिले आहेत.
(वृत्तसंस्था)
मलाला युसूफजईने मुलींच्या शिक्षणाबाबत सुरू केलेल्या साहसी प्रयत्नांची प्रशंसा करताना समितीने प्रतिभावान आणि गरजू विद्याथ्र्यासाठीच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली आहे. यासाठी 3क् लाख डॉलरची तरतूद करण्यात आली. यातील निम्मा निधी पाकमधील विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे.