शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

सिंगापूर परिषदेची आखणी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 4:23 PM

किम आणि ट्रम्प सिंगापूरमध्ये 12 जूनरोजी भेटतील. उत्तर कोरियाने मागिल आठवड्यात अचानक आपण या बैठकीत सामिल होणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुऴे ही बैठक होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती

प्योंगयांग- सिंगापूर येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची 12 मे रोजी हो असलेल्या परिषदेसाठी तयारी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियात आले आहे. उत्तर कोरियाशी चर्चा करण्यात मोठा वाव असल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट नक्कीच होईल असे सांगण्यात येत आहे. किम जोंग उन आणि माझ्या बैठकीसाठी तयारी करण्यासाठी आमचे अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियात पोहोचले आहे असे ट्रम्प यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.किम आणि ट्रम्प सिंगापूरमध्ये 12 जूनरोजी भेटतील. उत्तर कोरियाने मागिल आठवड्यात अचानक आपण या बैठकीत सामिल होणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुऴे ही बैठक होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.  पण त्यानंतर पुन्हा भूमिका बदलत आपण कोठेही आणि कधीही भेटण्यास तयार आहोत असे उत्तर कोरियाच्या नेत्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांची भेट घेतली होती. त्यामुळे कोरियन द्वीपकल्पातून अण्वस्त्रे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियातील अणू चाचणी केंद्राला काही परदेशी पत्रकार भेट देण्यासाठी गेले होते. अणू कार्यक्रम हळूहळू थांबवत असल्याच्या उत्तर कोरियाच्या घोषणेनंतर तेथिल सध्यस्थिती पाहाण्यासाठी हे पत्रकार पोहोचले होते. मात्र अमेरिकन लष्कराबरोबर सराव केल्यामुळे दक्षिण कोरियन पत्रकारांना तेथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.

 उत्तर कोरियन सरकारने मर्य़ादित स्वरुपात या अणुचाचणी स्थळाला भेट देण्याची परवानगी दिली. भूमिगत चाचण्या आणि इंटरकॉन्टीनेन्टल बॅलिस्टीक मिसाइलच्या चाचण्या थांबवू असे आश्वासन उ. कोरियाने दिले होते. 

द. कोरियाने अमेरिकन लष्कराबरोबर युद्धसराव केल्यामुळे उत्तर कोरियाने नुकतेच प्रस्थापित झालेले उच्च स्तरिय संबंध गोठवले. त्यामुळे या पत्रकारांच्या चमूमध्ये द. कोरियन पत्रकारांचा समावेश नाकारण्यात आला होताय उ. कोरियात आलेल्या पत्रकार बीजिंगमधून एका चार्टर्ड विमानातून आले. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड आणि चीन, रशिया या देशांतील पत्रकारांमध्ये समावेश होता.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उनKim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूर