नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत श्रीलंकेसारख्या देशात आर्थिक संकटामुळे निर्माण झालेली भयावह परिस्थिती आपण पाहिली आहे. दरम्यान, गोल्डमॅन सॉक्सचे सीनियर चेअरमन लॉयड ब्लेंकफेन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक चिंता वाढवणारी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसेच हे संकट फार मोठे आहे.
त्यांनी सीबीएसच्या फेस द नेशन कार्यक्रमात रविवारी सांगितले की, जर मी एक मोठी कंपनी चालवत असेन तर मी त्यासाठी पूर्णपणे तयार असतो. जर मी ग्राहत असतो, तर मी त्यासाठीही तयार असतो.
लॉयड ब्लेंकफेन यांनी या चर्चेदरम्यान सांगितले की, मंदी ही सामान्य प्रक्रिया नाही. तिला टाळण्याचा मार्ग हा खूप अरुंद आणि मर्यादित असतो. त्यांनी सांगितले की, फेडरल रिझर्व्हकडे महागाईला कमी करण्यासाठी खूप शक्तिशाली उपकरण उपलब्ध आहे. आणि त्याचा चांगला वापरही केला जात आहे. या फर्मच्या अर्थशास्त्रज्ञांनी या वर्षासाठी अमेरिकेच्या विकासदराच्या अंदाजात कपात करण्याचे संकेत दिले होते. त्याचदिवशी ब्लँकफेन यांचे भाकित प्रसारित झाले आहे.
दरम्यान, जॅन हेजियस यांच्या नेतृत्वाखालील गोल्डमॅनच्या इकॉनॉमिक टीमने अमेरिकेच्या जीडीपीच्या विस्ताराला २.६ वरून घटून २.४ करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच २०२३ च्या एस्टिमेटवा २.२ टक्क्यांवरून घटवून १.६ टक्के करण्यात आले आहे.
रिपोर्टमध्ये याला एक जरूर ग्रोथ स्लोडाऊन म्हटले आहे. तसेच याच्या मदतीने महागाईच्या दरावर अंकुश लागू शकतो, असेही म्हटले आहे. मात्र या मंदीमुळे बेरोजगारीच्या आकड्यात वाढ होऊ शकते. मात्र बेरोजगारीच्या वेगवान वाढीला टाळता येऊ शकते.