नवी दिल्लीः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुकीसाठीचं मतदान संपलेले आहे. काही वेळातच निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. काही एक्झिट पोलमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि काहींच्या मते ज्यो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील असा दावा केला आहे. प्रत्येकजण जगातील सर्वात सामर्थ्यवान देशाच्या सिंहासनावर कोण बसणार आहे याची वाट पाहत आहे. लवकरच याबाबतचा निकाल स्पष्ट होईल. पण एक प्रश्न आहे, की यामुळे भारतीयांना काय फायदा होईल?
दोन्ही उमेदवारांनी भारतीय मतदारांना केलं आकर्षित
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार बायडन असो, दोन्ही उमेदवारांनी भारतीय मतदारांची मनं जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ही निवडणूक कोणीही जिंकू अथवा हरू याचा परिणाम अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांवर होणार नाही असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सध्या दोन्ही देशांमधील संबंधही मजबूत आहेत. याचे उदाहरण म्हणजे जेव्हा मोदी अमेरिकेत गेले तेव्हा अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' (Howdy Modi) हा कार्यक्रम झाला. तसेच कोरोनापूर्वी ट्रम्प भारतात आले, तेव्हा अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बायडन-ट्रम्प यांची भूमिका महत्त्वाची
बायडनचा विजय भारतासाठी आनंददायी ठरू शकेल, असं तज्ज्ञांचे मत आहे. बराक ओबामा यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीत भारत-अमेरिकन संबंधांमध्ये उपराष्ट्रपती म्हणून ज्यो बायडन यांनी चांगले काम काम केला. रिपब्लिकन कारकिर्दीत बायडन यांनी भारताचे समर्थन केले आहे. भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मंजुरीसाठी आणि द्विपक्षीय व्यापारातील ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दीष्ट ठेवण्यात बायडन यांचा मोलाचा वाटा होता.
बायडन यांचा दृष्टीकोन
तसेच, बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्या वतीने, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत, तर बायडन यांचे दोन महत्त्वाचे सल्लागारदेखील भारतीय वंशाचे आहेत. याखेरीज बायडन यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले आहे की, ओबामा-बायडन प्रशासनाने नेहमीच भारताशी मजबूत संबंधांना प्राधान्य दिले. जर मी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले आलो तर त्याला सर्वप्रथम प्राधान्य असेल.
ट्रम्प यांची ताकद
त्याचबरोबर ट्रम्प यांच्या पुन्हा येण्याने जागतिक पातळीवर चीनचा पर्दाफाश करणे सुलभ होईल. या विषयावर दोन्ही देशांचे समान राष्ट्रीय हित आहे. सध्या भारत आणि अमेरिका या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. त्याचबरोबर ट्रम्प सरकारच्या काळात संरक्षण आणि उर्जा क्षेत्रात केलेल्या करारास चालना मिळेल. आरोग्य क्षेत्रातही सकारात्मक योजना अपेक्षित आहेत.
अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीयांची भूमिका काय?
वास्तविक अमेरिकेत भारतीय वंशाचे ४० लाख लोक आहेत. त्यातील २० लाख मतदार आहेत. अमेरिकेतील एरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन आणि टेक्साससह ८ जागांवर भारतीयांची मते बरीच प्रभावी आहेत. राजकीयदृष्ट्या, भारतीय वंशाचे लोक येथे शक्तिशाली आहेत. एकूण ५ खासदार भारतीय वंशाचे आहेत,अमेरिकेत एकूण १२% भारतीय वैज्ञानिक आहेत. नासामधील वैज्ञानिकांपैकी ३६% भारतीय आहेत. तर ३८% डॉक्टर भारतीय आहेत. यूएस-आधारित तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टचे ३४% कर्मचारी भारतीय वंशाचे आहेत. या व्यतिरिक्त, XEROX मध्ये भारतीयांचा कब्जा आहे आणि तेथे १३% भारतीय काम करतात. आयबीएमच्या कर्मचार्यांपैकी २८% भारतीय वंशाचे आहेत. या अर्थाने, अमेरिकेसाठी भारत आणि भारतीय महत्त्वाचे आहेत.