शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 05:47 IST

US Election 2024: माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यापैकी जगातील सर्वांत बलाढ्य देशाचा प्रमुख कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली - माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यापैकी जगातील सर्वांत बलाढ्य देशाचा प्रमुख कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेत मराठी लोकांची संख्याही खूप आहे. अशात या निवडणुकीबाबत अमेरिकेतील मराठी लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने केला.

अॅरिझोना या राज्याचे निवासी योगेश मंत्री यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत प्रो-चॉइस किंवा प्रो- लाइफ अर्थात गर्भपाताचा अधिकार असावा की नसावा, इमिग्रेशन आणि अर्थव्यवस्था हे तीन मुद्दे निर्णायक ठरणार आहेत. ट्रम्प प्रो-लाइफच्या बाजूने आहेत, तर कमला हॅरिस प्रो- चॉइसच्या बाजूने आहेत. ट्रम्प सर्रास खोटे बोलतात. लॉ अॅण्ड ऑर्डरशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. जो माझा समर्थक नाही, तो या देशाचा शत्रू आहे, असे ट्रम्प यांचे ठाम मत आहे. अमेरिकेला नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता हवा असे अमेरिकेतील व्यावसायिक प्रकाश भालेराव म्हणाले, या निवडणुकीकडे मी अमेरिकन या दृष्टिकोनातून पाहतो. ही निवडणूक आणि अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्षांचे निर्णय आणि धोरण अमेरिकेच्या एकंदरीत पुढील वाटचालीवर कोणता परिणाम करतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कुणाला हॅरिस, तर कुणाला हवे ट्रम्प ■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९मध्ये टेक्सास येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतल्यापासून भारतातील लोकांचे ट्रम्प यांच्या बाबतीतील मत सकारात्मक झाले आहे. ट्रम्प निवडून आले. तर भारतासाठी खूप चांगले होईल, असे भारतात राहणाऱ्या लोकांना वाटते. ■ मात्र, पूर्व आणि पश्चिम अमेरि- केतील भारतीयांना ट्रम्प फारसे आवडत नाहीत. याउलट, कमला हॅरिस निवडून याव्यात, अशी भावना येथील काही मराठी लोकांमध्ये आहे, असे काहींनी सांगितले.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पKamala Harrisकमला हॅरिस