ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदान होत असताना कॅलिफोर्नियामध्ये मतदान केंद्रावर गोळीबारी झाल्याची माहिती मिळाली आहे. अझुला येथे मतदान केंद्रावर गोळीबार झाला आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तीन लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अझुला मतदान केंद्र बंद करण्यात आलं असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अमेरिकी जनता आपला 45वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करत आहे. देशातील 50 राज्ये आणि वॉशिंग्टन डी सीमध्ये वेगवेगळ्या वेळांनुसार मतदान होत आहे. 13 राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेनुसार मतदान होत आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते 7 दरम्यान मतदान केंद्र सुरु करण्यात आले. मतदान केंद्र सकाळी 7 ते 8 दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. मतदारांच्या संख्येवर मतदान केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय अवलंबून असेल.
अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडला जाईल.
#UPDATE 1 dead, 3 injured after reported shooting near polling site in Azusa,California: AP #USElection2016— ANI (@ANI_news) 9 November 2016