अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. यापूर्वी ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्षही राहिले आहेत. गेल्या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षाने त्यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होते. मात्र, हार न मानता त्यांनी चार वर्षे प्रतीक्षा केली. यानंतर त्यांच्या पक्षाने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून घोषित केले. तेव्हा ही निवडणूक ट्रम्प जिंकतील, असे कुणीही ठामपणे सांगू शकत नव्हते. मात्र, एका फोटोने अमेरिकन निवडणुकीची संपूर्ण दिशाच बदलून टाकली.
हा फोटो होता 13 जुलै 2024 चा, पेनसिल्व्हेनियातील बटलर पार्कचा. याच ठिकाणी ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून ते सुदैवाने बचावले आणि यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले. यावेळच्या, रक्त लागलेल्या चेहऱ्यासह मूठ आवळून उभे राहिलेल्या ट्रम्प यांच्या फोटोने संपूर्ण जगाला थक्क केले होते.
'फाईट-फाईट-फाईट' -या फोटोचा परिणाम असा झाला की, अमेरिकेत त्यांचे जनसमर्थन वाढले. कदाचित दुसरा कुणी नेता असता, तर त्याने पुन्हा सभा घेण्यापूर्वी चार वेळा विचार केला असता. पण ट्रम वेगळ्याच मातीचे बनले आहेत. ज्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यांनी त्याच ठिकाणी पुढच्या दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सभा घेतली. या घटनेमुळे, लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासही ट्रम्प यांना मोठी मदत झाली. ट्रम्प यांना गोळी चाटून गेली असतानाही, ते आपली मुठ हवेत उंचावत 'फाईट-फाईट-फाईट' असे ओरडत होते. हल्लेखोर आपल्याला पुन्हा लक्ष्य करू शकतो, याची परवाही त्यांनी केली नही. यावेली, अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस स्नायपरने हल्लेखोराला तत्काळ जागेवरच ठार केले होते.
कुणी केला होता हल्ला? -ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स असल्याचे अमेरिकेची सर्वोच्च तपास संस्था एफबीआयने सांगितले होते. तो 20 वर्षांचा होता आणि पेनसिल्व्हेनियातील बेथल पार्क येथील रहिवासी होता. जे ट्रम्प यांच्या रॅलीच्या ठिकाणापासून केवळ 70 किमी अंतरावर आहे.